AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune illegal Schools : पालकांनो, इकडे लक्ष द्या..! शिक्षण विभागानं प्रसिद्ध केली पुण्यातल्या अनधिकृत शाळांची यादी, वाचा सविस्तर…

नवीन शाळा सुरू करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक असून केवळ संबंधित मंडळाची परवानगी पुरेशी नाही. हे राज्य मंडळ किंवा इतर कोणत्याही बोर्ड जसे की CBSE, ICSE इत्यादी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना लागू आहे.

Pune illegal Schools : पालकांनो, इकडे लक्ष द्या..! शिक्षण विभागानं प्रसिद्ध केली पुण्यातल्या अनधिकृत शाळांची यादी, वाचा सविस्तर...
अनधिकृत शाळा/औदुंबर उकिर्डे (शिक्षण उपसंचालक - संपादित छायाचित्र)
| Updated on: Jun 12, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : सोमवारपासून (13 जून) बहुसंख्य शाळा सुरू होत असताना, पुणे महानगरपालिकेच्या (PMC) शिक्षण विभागाने पुणे शहरातील सर्व पालकांना बेकायदेशीर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीएमसीच्या शिक्षण विभागाने पुणे महापालिकेच्या हद्दीतील 16 शाळांना बेकायदेशीर (Illegal schools) म्हणून सूचीबद्ध करणारे पत्र, पुणे शिक्षण उपसंचालकांना पाठवले आहे. या शाळांना रितसर परवानग्या नसल्याने शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील 27 बेकायदा शाळांची अशीच यादी शिक्षण विभागाने (Education department) प्रसिद्ध केली असून त्यांना या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश न घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या शाळांना परवानगी नाही आणि तेथे कोणीही प्रवेश घेऊ नये, असे सांगत शिक्षण विभागानेही या शाळांना बाहेर फलक लावण्याच्या कठोर सूचना केल्या होत्या.

‘ही एक गंभीर समस्या’

पुण्याचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे म्हणाले, की ही एक गंभीर समस्या असून, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आमचे सर्व पालकांना आवाहन आहे. आतापर्यंत, आम्हाला पुणे जिल्ह्यातील 27 बेकायदेशीर शाळांची यादी मिळाली होती, तर आता महापालिका हद्दीमध्ये आणखी 16 बेकायदेशीर शाळा सापडल्या आहेत.

‘कठोर कारवाई करणार’

हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या या शाळांवर काय कारवाई करणार, असे विचारले असता ते म्हणाले, की या सर्व बेकायदेशीर शाळांना मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, वर्गही सुरू करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळा पुन्हा वर्ग सुरू करताना आढळल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल.

‘रीतसर परवानगी हवी’

नवीन शाळा सुरू करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक असून केवळ संबंधित मंडळाची परवानगी पुरेशी नाही. हे राज्य मंडळ किंवा इतर कोणत्याही बोर्ड जसे की CBSE, ICSE इत्यादी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना लागू आहे. मात्र असे निदर्शनास आले आहे, की काही शैक्षणिक संस्थांनी कोणत्याही प्रकारची राज्य सरकारची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता थेट शाळा सुरू केल्या आहेत.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आढळलेल्या बेकायदेशीर शाळा –

1. ज्ञानप्रबोधिनी प्रथमिक विद्यामंदिर, शाखा क्र. 3 काळेपडळ

2. महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, संजय पार्क

3. आशा इंग्लिश मीडियम स्कूल, खोसे पार्क, लोहगाव

4. कॅनरी इंटरनॅशनल स्कूल, येरवडा

5. लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कलवड वस्ती

6. ज्ञानसंस्कार प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा, धनकवडी

7. ट्विन्स लँड स्कूल, कोंढवा

8. इक्रा इस्लामिक स्कूल, वानवडी

9. नोबल इंग्लिश स्कूल, गुरुवार पेठ

10. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक

11. अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, बालाजीनगर

12. इंग्रजी माध्यम लाटवन शाळा,धनकवडी

13. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी

14. शांतीनिकेतन शाळा, येरवडा

15. आयडियल पब्लिक स्कूल, डीएसके रोड, विठ्ठल नगर

16. सेंट झेवियर्स प्रायमरी स्कूल, सिंहगड रोड

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.