पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिलाय. ते पुण्यात बोलत होते.