ST प्रवासात ५० टक्के सवलतीच्या किती महिलांनी घेतला लाभ, प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

राज्य शासनाने अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना सुरु केली. राज्यातील महिलांना एसटीने प्रवास करताना सवलत देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांनी एसटीने प्रवास केला.

ST प्रवासात ५० टक्के सवलतीच्या किती महिलांनी घेतला लाभ, प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 12:39 PM

योगेश बोरसे, पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा झाली होती. ही घोषणा म्हणजे ST प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. 17 मार्चपासून या सवलतीस सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांत पुणे विभागातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यातून महामंडळाला भरभक्कम उत्पन्नही मिळाले. काही ठिकाणी नियम माहीत नसल्याने अडचणी आल्या. राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव महिला सन्मान योजना आहे.

किती जणांनी घेतला लाभ

अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांनी एसटीने प्रवास केल्यामुळे महामंडळाच्या खात्यात सुमारे 35 लाख रुपयांची भर पडली आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी प्रवास केला.

हे सुद्धा वाचा

महिला सन्मान योजनेतील प्रवासात 50 टक्के सवलत आहे. मात्र या प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? हा सगळ्या प्रश्नांची उत्तरेही जाणून घेऊ.

सवलतीचे नियम व अटी

  • सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयनयान, शिवशाही, शिवनेरी, शिवाई यांच्यांत सवलत
  • महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
  • प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपये तिकीट काढावे लागणार.
  • राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरता येणार आहे. मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा वेगळा दर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
  • शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही
  • आरक्षण करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही
  • 5 ते 12 वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत असणार आहेत
  • 75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत आहे. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.