Supriya Sule: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे संकेत; सुनेत्रा पवार एक पाऊल पुढं टाकणार? मोठी घडामोड काय?

Supriya Sule on NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांनी याविषयीचे मोठे वक्तव्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सुद्धा केली आहे. राजकारणातील मोठी घडामोड आहे तरी काय?

Supriya Sule: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे संकेत; सुनेत्रा पवार एक पाऊल पुढं टाकणार? मोठी घडामोड काय?
सुप्रिया सुळे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 12:44 PM

अजिंक्य धायगुडे पाटील/ प्रतिनिधी: दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाविषयी शरद पवार पक्षाने भूमिका जाहीर केली. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात बैठकांचे किती सत्र झाले. कुठे बैठकी झाल्या इथपासून ते सीसीटीव्हीत कोण-कोणते नेते दिसले इथपर्यंतच्या अनेक बातम्या समोर आल्या. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कानावर हात ठेवले. काल या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असे वक्तव्य करत या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे संकेत दिले होते. तर आज शिवनेरी येथे आल्यानंतर त्यांनी विलिनीकरणासह दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र काम (Supriya Sule on Rashtrawadi Merger) करण्याविषयी मनातील भावना व्यक्त केल्या.

रोहित पवारांना सुरक्षा द्या

यावेळी ज्याप्रमाणे रोहित पवार लढत आहेत. ते अनेक मुद्दे आणि भावना मांडत आहेत. मुलांमध्ये अस्वस्थता आहे. रोहितमध्ये अस्वस्थता आहे धावपळ करून अनेक मुद्दे समोर आणले. समस्त पवार कुटुंब आणि लाखो लोकांना मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणारे आहेत. पार्थ आणि जय यांना मोठा धक्का आहे. यातून जय यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित अनेक मुद्दे मांडत आहे अनेकांना त्याची काळजी वाटत आहे. त्यामुळे सरकारने रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंच्या मनात काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले. तसेच महानगरपालिकेसह, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार होते. अमोल कोल्हे यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार होते. तटकरे आणि पटेलांमुळे हे सर्व रखडतंय का याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सुळे यांनी रामकृष्ण हरी असे उत्तर दिले. तर अमोल दादा यावर सविस्तर बोलले आहेत. पक्षाचं वास्तव अमोल दादा यांनी मांडले आहे. वेगळं मला बोलावासं वाटत नाही, असे सुळे म्हणाल्या. माझा भाऊ गेला आहे. त्याचं दु:ख आयुष्यभर भरून निघणार नाही. आता दादा राहिले नाहीत, काय फरक पडतो आता काय खोटं काय खरं. सीसीटीव्ही कशाला हवा. माणूस आहेत ना बोलायला. खरं, आता सगळ्यांना माहिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी मनातील भावनाही व्यक्त केल्या. आम्हाला ही एकत्र काम करायची इच्छा आहे. काल ही होती, आज ही आहे आणि उद्या राहील पण या गोष्टीला आता थोडा वेळ पूर्णविराम देऊयात, असे त्या म्हणाल्या. आम्हाला अस्वस्थ वाटतं, आपल्यापेक्षा मोठे असलेल्या लोकांच्या विरोधात बोलणं मला आवडत नाही. वास्तव माझ्या दादाला माहिती होतं आणि मला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

विमान अपघाताच्या बाबत येणार्‍या अहवालाबाबत आम्ही हट्ट धरला होता. संसदेत आम्ही हा विषय मांडला असून संसदेत आम्ही उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.आता जय पवार सुद्धा या प्रक्रियेत आले आहेत पारदर्शक माहिती मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी सुरू राहील असे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us