Manoj Jarange : सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, मनोज जरांगेंची कर्जमाफीप्रकरणात सरकारवर सडकून टीका, काय केला गंभीर आरोप?
Manoj Jarange on loan Waiver : 30 जून 2026 रोजीपर्यंत सरकार कर्जमाफीची घोषणा करणार असे आश्वासन देण्यात आले. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर याप्रकरणात सडकून टीका केली आहे.

शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करावा आणि कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये आंदोलन सुरू होते. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या मुंबईतील बैठकीत 30 जून 2026 रोजीपर्यंत सरकार कर्जमाफीची घोषणा करणार असे आश्वासन देण्यात आले. आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर याप्रकरणात सडकून टीका केली आहे. त्यांनी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा दावा केला आहे.
सरकारने शेतकऱ्यांची केली फसवणूक
कर्जमाफीच्या आश्वासनावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. न्यायालयाचा आपण सन्मान करतो. आजची परिस्थिती भयानक आहे. सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मेलाच ना. तुम्ही म्हणताय सहा महिन्यांनी देऊ. मग शेतकरी कसा जगेल? हे विश्वास ठेवण्यासारखं नाही. मोगलांपेक्षा हे सरकार जास्त क्रुर वागतं आहे. सरकार सूड भावनेनं वागत आहे. मला राज्य सरकारने दिलेली मदत आणि केंद्र सरकारने दिलेली मदत मान्य नाही. शेतकऱ्यांने कुणावरही विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांने दंडूके हाती घेतले पाहीजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या. समिती वैगरे काही नको. समिती बरखास्त करा. नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
शेतकरी आंदोलनासंबंधी आपण काही तज्ज्ञ नाही. हे लोक काहीही करु शकतात असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस हे असे आहेत की ते एकदा गोड बोलणार आणि दुसरा डाव टाकणार असा आरोप त्यांनी केला. ओबीसी आमचा डीएनए आहे. आम्ही काही जेरीस येत नाही. दोन्हीकडून गोड बोलू नका असे ते म्हणाले. एकीकडे म्हणायचं ओबीसी का धक्का लागला नाही. एकीकडे म्हणायचं जी आर दिला. मग प्रमाणपत्र कधी देणार ? असा सवाल जरांगे यांनी केला. सातारा संस्थान लागू होणार असल्याचे ते म्हणाले. फडणवीस आणि आपला काही बंधाऱ्याला बंधारा नाही. पण सरकार पुढील प्रक्रिया करत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठा आता शांत राहणार
मराठा आता पेटनार नाही. आमचा जीआर निघाला आहे. हैदराबाद संस्थानचा जीआर निघाल्यामुळे गोर गरीबांना दिलासा मिळाला असे जरांगे पाटील म्हणाले. मी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे दमादमाने आरक्षणात घालणार. ते येवल्यावालं पांढरं पडलंय आता. मराठ्यांना विनंती आहे की जीआर प्रमाणपत्र फेसबूकला टाकू नका, असे आवाहन ही जरांगे यांनी केले.
