AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा

मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा
| Updated on: Dec 16, 2020 | 9:29 AM
Share

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. या मार्गावरुन प्रवास करताना आता तुम्हाला वेगाला वेसण घालावी लागणार आहे. कारण या मार्गावरील वेगमर्याता आता 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करताना आता तुम्हाला वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. (Speed ​​limit on Mumbai-Bangalore bypass)

मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांकडून गाड्यांच्या वेगाला वेसण घालण्यासाठी हा उपाय करण्यात आलाय. बाह्यवळण मार्गावर कात्रज परिसरातील नवीन कात्रज बोगदा ते वारजे भागातील मुठा नदीवरील पुलापर्यंतच सर्वेक्षण नुकतच करण्यात आलं. या भागात वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. या मार्गावर गेल्या महिन्यात गंभीर स्वरुपाचे एकूण 6 अपघात घडले आहेत. त्यामुळे ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात गतिरोधक, अपघात प्रवण क्षेत्राची माहिती देणारे फलक बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार!

पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्यास लागणारा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याठिकाणी असणाऱ्या बोगद्याचे काम 2 किलोमीटरपर्यंत झाले आहे. द्रुतगती महामार्गावरील खंडाळा (बोर) घाटमाथा परिसरात अनेक नागमोडी वळणे तीव्र चढ उताराची आहेत. या क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या परिसरात शेकडो अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जण जायबंदी झाले आहेत. घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर उपाय म्हणूनच हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवला जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
  • बोगदा क्र. 1 : 1.75 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
  • बोगदा क्र. 2 : 8.92 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
  • बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार
  • मुंबई आणि पुण्याकडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांना क्रॉस पॅसेजव्दारे जोडण्यात येणार
  • खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 व्हाया डक्टसह नवीन रस्ता आणि खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे
  • व्हायाडक्ट क्र. 1 : 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल
  • व्हायाडक्ट क्र. 2 : 650 मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल
  • 8 पदरीकरण : 5.86 किलोमीटर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट

संबंधित बातम्या:

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

ई-बाईक सेवा देणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार!

Speed ​​limit on Mumbai-Bangalore bypass

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.