गुलाबी थंडीत पर्यटन…हवामान विभागाने दिला हा सल्ला

cold temperatures and winter weather | आता काही दिवसांत सुट्या सुरु होणार आहे. परंतु राज्यात आणि देशात वातावरणात बदल होत आहे. यामुळे पर्यटनाचे नियोजन करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर हवामान विभागाने उत्तर दिले आहे.

गुलाबी थंडीत पर्यटन...हवामान विभागाने दिला हा सल्ला
matheran hill station
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 12:17 PM

पुणे | 10 डिसेंबर 2023 : हिवाळ्याच्या थंडीत फिरण्यासाठी अनेक जण जातात. त्यातच आता काही दिवसांत सुट्या सुरु होणार आहे. परंतु राज्यात आणि देशात वातावरणात बदल होत आहे. कधी कुठे पाऊस पडतो, कुठे गारपीट होते. नुकतीच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पर्यटनासाठी जाण्यापूर्वी हवामान विभागाचा सल्ला घेणे आता गरजेचे झाले आहे. राज्यात आता पाऊस आहे का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. या उत्तरामुळे बिनधास्तपणे पर्यटनाचे नियोजन करा, असे म्हणावे लागणार आहे. थंडीच्या आनंदासोबत निसर्गरम्य ठिकाणांवर जात येणार आहेत.

कसे असणार राज्यातील हवामान

राज्यात पुढील दहा ते पंधरा दिवस वातावरण चांगले असणार आहे. हवामान कोरडे असणार आहे. सुटीचे नियोजन आणि सहलीसाठी जाण्यासाठी हा काळ चांगला आहे. हिवाळाचा आनंद साजरा करता येणार आहे. कारण पुढील काही दिवस राज्यातील हवामान चांगले असणार आहे. राज्यात कुठेही हवामान बदलाची शक्यता नाही, असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे परिसरात धुके राहणार

पुणे आणि परिसरात पहाटे धुक्याची चादर असणार आहे. यामुळे या काळात सकाळी लवकरण उठून फिरणे आरोग्यासाठी चांगले असणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी असणार आहे. चार ते पाच दिवस रात्री थंडी असणार आहे. यामुळे आता नाताळ आणि वर्षअखेरचा आनंद पर्यंटनस्थळी जाऊन बिनधास्तपणे घेता येणार आहे. पुणे परिसरात गड किल्ले आहेत. त्या ठिकाणी पर्यटनासाठी चांगली गर्दी होऊ लागली आहे. त्याचबरोबर लोणावळा आणि माथेराणमध्ये नाताळ आणि वर्षअखेरसाठी बुकींग सुरु झाले आहे. या पर्यटकांना निसर्गाचा चांगला आनंद घेता येणार आहे. कारण या काळात वातावरणात कोणताही बदल राहणार नाही.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.