Pune accident : पुण्यातल्या लवळेत ब्रेक फेल झालेला ट्रक दुचाकीला आदळला, 10 महिन्याच्या चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू

दुसऱ्या दुचाकीवरील एका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित महिलेला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रेश्मी पवन पटेल (वय 30) आणि रिहान पवन पटेल (वय 10 महिने) यांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला.

Pune accident : पुण्यातल्या लवळेत ब्रेक फेल झालेला ट्रक दुचाकीला आदळला, 10 महिन्याच्या चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू
यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:02 PM

पुणे : पुण्यातील लवळे फाट्याजवळ अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू (Death in accident) झाला आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. तीन दुचाकी आणि चारचाकी गाडीचे या अपघातात नुकसान झाले आहे. एकाला दवाखान्यात दाखल (Admitted in hospital) करण्यात आले आहे. तर 10 महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे कोलाड महामार्गावरील लवळे फाटा (ता. मुळशी) याठिकाणी संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान दोन ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एक महिला तर दहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर (Seriously injured) आहे. दरम्यान, अपघातानंतर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

बाळ आणि आईचा मृत्यू

लवळे फाट्यावर फरशीने भरलेला ट्रक पौडच्या दिशेने सायंकाळच्या सुमारास जात होता. त्याच्या पुढे दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी तीन वाहने प्रवाशांसह जात होती. यावेळी ट्रकचे ब्रेक फेल झाला. ट्रकचा वेग जास्त असल्याने यावेळी चालकाला काहीही करता आले नाही. या वेगवान आणि ब्रेक फेल झालेला ट्रक समोरील वाहनांना जोरदार धडकला. त्यावेळी पुढील बाजूस असलेल्या दुचाकीवर बाळासह चाललेल्या दांपत्याला जोरदार ठोकरल्याने बाळ आणि आईचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातानंतर वाहतूक कोंडी

दुसऱ्या दुचाकीवरील एका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित महिलेला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेश्मी पवन पटेल (वय 30) आणि रिहान पवन पटेल (वय 10 महिने) या मायलेकांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला असून दवाखान्यातील मृत्यू झालेल्या महिलेचे अद्याप नाव समजू शकलेले नाही. अपघात घडलेल्या ठिकाणी तत्काळ दाखल होत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. अपघातामुळे वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलीस राजेश गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.