AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठे अपडेट, UPSC तर्फे गुन्हा दाखल…पुढे जाऊन…

pooja khedkar police inquiry: पंतप्रधान कार्यालयाने पूजा खे़डकर प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. आता यूपीएससीने गुन्हा दाखल केला आहे.

पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठे अपडेट, UPSC तर्फे गुन्हा दाखल...पुढे जाऊन...
पूजा खेडकर
| Updated on: Jul 20, 2024 | 7:31 AM
Share

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करु नये? अशी नोटीस पाठवली आहे. राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

यूपीएससीकडून सर्वात मोठे पाऊल

यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा-2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षा नियमांनुसार दिली नाही. परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली. त्यामुळे यूपीएससीने पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे.

निवड रद्द का करु नये? कारणे दाखवा नोटीस

पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या आहेत. त्यांची सिव्हिल सर्व्हीसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस (SCN) जारी केली आहे. सेवा परीक्षा-2022/ नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांनुसार ही नोटीस दिली आहे. तसेच भविष्यातील परीक्षा/निवडीपासून बंदी केली आहे.

पूजा खेडकर विरोधात आता सरळ संघ लोकसेवा आयोगाने कारवाई सुरु केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांची आयएएस म्हणून झालेली निवड रद्द होण्याची शक्यता आहे. गाडी, कॅबिन, खासगी गाडीवर अंबर दिवा हे प्रकार करणारी पूजा खेडकर यांची निवडच धोक्यात आली आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.