AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती पवारांचा सातबारा नाही, ६ लाख मतदार विरोधात असल्याचा दावा करत तिसरा खेळाडू मैदानात

lok sabha election 2024: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतला.

बारामती पवारांचा सातबारा नाही, ६ लाख मतदार विरोधात असल्याचा दावा करत तिसरा खेळाडू मैदानात
Sunetra pawar and supriya suleImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 12, 2024 | 7:10 AM
Share

योगेश बोरेस, पुणे  : बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. विद्यामान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय लढाईची चर्चा सुरु होती. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.

विजय शिवतारे यांच्या तोंडी हर्षवर्धन पाटलांची भाषा

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आरपारची लढाई लढण्याची घोषणा केली. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

कसा केला होता पराभव

राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी शिवतारे यांना चँलेज दिले. अजित पवार म्हणाले होते की, “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा बारामती लोकसभा मतदार संघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

सासवडमधील तो अपमान जनतेचा

सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचा हल्ला विजय शिवतारे यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावा त्यांनी करत येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला. आता गुलामगिरी करणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. यामुळे येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशा लढाई होण्याची शक्यता आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.