बोरघाटात बस दरीत कोसळली, बाप-लेकीसह पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळल्याने पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे (Raigad Accident). तर जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.

Mumbai-Pune Express Way Accident, बोरघाटात बस दरीत कोसळली, बाप-लेकीसह पाच जणांचा मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याने पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे (Mumbai-Pune Express Way Accident). तर जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 वर्षाचा चिमुकला आणि बाप-लेकिचाही समावेश आहे (Bus fallen in Borghat Valley ). बोरघाटात हा भीषण अपघात घडला. बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस थेट दरीत कोसळली.

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात गरमाळ पॉईंटजवळ पहाटे पाचच्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळली. ही बस कराडहून मुबंईच्या दिशेन जात होती. बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी प्रवास करत होते. पहाटे पाचच्या सुमारास बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन वर्षाचा चिमुकला, एक मुलगी, एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात बाप-लेकिलाही त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

या अपघातात तब्बल 30 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ कामोठे, खोपोली, पवना येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बस दरीत कोसळल्यानंतर झाडावर अडकल्याने बसमधील इतर प्रवाशांचा जीव वाचला आणि एक मोठा अनर्थ टळला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *