Eknath Shinde Irshalwadi | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा इर्शाळवाडीत, आधी मदतीची घोषणा आणि आता..

Eknath Shinde Irshalwadi | दरड कोसळल्यानंतर इर्शाळवाडीतील सर्वच ग्रामस्थ रस्त्यावर आले. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतर ग्रामस्थांच्या तात्पुरत्या सोयीसाठी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

Eknath Shinde Irshalwadi | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा इर्शाळवाडीत, आधी मदतीची घोषणा आणि आता..
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 5:06 PM

महाड | इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अनेक गावकऱ्यांना दरड कोसळल्याने मृत्यू झाला. इर्शाळवाडीवर दुःखाचं डोंगर कोसळले. सरकार इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या पाठीशी ठीम उभे राहिले. सरकारने मदतीचा हात पुढे करत इथल्या रहिवाशांसाठी खालपूर चौक या भागात एक सुंदर गाव उभं केलं आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

सरकारकडून पुरवण्यात ये असलेल्या गोष्टींमध्ये सकाळ,दुपार आणि संध्याकाळ 200 जणांचं जेवण, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, 24 तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी रहिवाशांसाठी करण्यात आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

इर्शाळवाडीतील 144 जणांचं सुरक्षित स्थलांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी असलेल्या निवारा केंद्राची पाहणी केली. या दरम्यान  एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह संवाद साधला. इर्शाळवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ग्रामस्थांच्या येथील ताप्तुरत्या निवारा केंद्रात एकूण 144 आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.

नक्की काय झालं होतं?

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर 20 जुलै रोजी रात्री 11 दरम्यान दरड कोसळली. दरड कोसळल्याने इर्शाळवाडीतील जवळपास 40 घरं दरडीखाली चिरडली गेली. दरड कोसळल्याची माहिती राज्यभर काही तासांनी पसरली. त्यानंतर माहिती मिळताच अनेक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर दुसऱ्या बाजूला युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होतं. एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या मदतीने दरडीखाली अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

एनडीआरफने काहींचा जीव वाचवण्यात आला. तर काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. या दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर राज्य सरकराने तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आता इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.