सुनिल तटकरेंकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले दादा म्हणजे…

Sunil Tatkare on Ajit Pawar : रायगडमध्ये बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाचं तोंडभरून कौतुक केलंय. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक करताना काय म्हटलं? तटकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

सुनिल तटकरेंकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले दादा म्हणजे...
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 3:45 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, रायगड | 18 फेब्रुवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवारांचं कौतुक केलंय. अजितदादा हे उत्साहमूर्ती आहेत… त्यांच्या नेतृत्वावर तरूणाईचा विश्वास आहे. अजितदादा हे अजब रसायन आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याकडून ऊर्जा घेतात. त्यांच्या भेटीने सर्वांना आनंद मिळतो. त्यांना भेटलं की कार्यकर्ते जोशमध्ये काम करतात, असं तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं. त्यावर तटकरेंनी भाष्य केलंय. शिवाय रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवरही सुनील तटकरेंनी भाष्य केलंय.

राष्ट्रवादीच्या निकालावर भाष्य

निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्याचवेळेला सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना आव्हान दिलेले आम्ही कॅव्हेट दाखल केलेली आहे. उद्या याची सुनावणी आहे की प्राथमिक सुनावणी त्या ठिकाणी असणार आहे. आमच्याकडून ज्येष्ठ विविध लोक उपस्थित राहतील. मला एका गोष्टीचा विश्वास आम्ही जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णय निवडणूक आयोग गठीत झाल्यापासून वेगवेगळ्या पक्षाच्या यात निर्णय दिले. तोच निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालाय, असं सुनिल तटकरे म्हणाले.

…याचा मला विश्वास- तटकरे

न्यायालयांमध्ये आव्हान देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तसा तो शरद पवार गटालाही आहे. न्यायालयीन लढाई पूर्ण ताकतीने कायदेशीर रित्या लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. माझं दिल्लीतल्या ज्येष्ठ वकिलांसोबत संपर्क आहे. मला विश्वास आहे जे निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. त्यावर योग्य तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल असा मला विश्वास, असंही तटकरे म्हणाले.

रायगडच्या उमेदवारीवरून वाद?

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून वाद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावरही सुनिल तटकरे यांनी भाष्य केलं. काल आणि आज अजितदादांनी स्पष्ट केलंय. राज्य पातळीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजितदादा चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या सर्वांचे एक बैठक झाली. अजित दादांनी त्या बैठकीचा उच्चार त्या ठिकाणी केला आहे. मी राष्ट्र्वादी प्रदेश अध्यक्ष आहे. महाराष्ट्राच्या 48 जागा जिंकणं हे आमच्या सर्वांचा उद्दिष्ट आहे, असं सुनिल तटकरे म्हणालेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.