"संघर्ष पाचवीला पुजलेला, सरकार कुणाचंही असलं तरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार"

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected farmer) शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

"संघर्ष पाचवीला पुजलेला, सरकार कुणाचंही असलं तरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार"

सोलापूर: शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected farmer) शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकार कुणाचंही असलं तरी संघर्ष सुरूच राहिल, असं मत राजू शेट्टी यांनी (Raju Shetti on rain affected farmer) व्यक्त केलं. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. सरकारी आकडे 70 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झाल्याचं सांगत आहेत. मात्र, वास्तवात 85 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उसाचे क्षेत्र 55 टक्के कमी झालं आहे. त्यामुळे कारखाने 80 ते 85 दिवसच चालतील. याचा परिणाम म्हणून साखर कारखान्यावरील संकट मोठं झालं आहे.”

मागील वर्षी ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. त्या कारखान्यांना यावर्षी गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी राजू शेट्टींनी यावेळी केली. एफआरपी दिलेली नसतानाही अशा कारखान्यांना गाळपाची परवानगी दिली गेली, तर नाईलाजान स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेईन, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

‘भाजप शेतकरी विरोधी हे आता स्पष्ट झालं’

भाजप शेतकऱ्यांच्या बाजूने नसून शेतकरी विरोधी आहे हे आता स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. जीडीपी घटला असून शेती क्षेत्राची आर्थिक वाढ झाली नाही. विमा कंपनीने 12 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मात्र, सरकार हतबल असल्याचं दिसत आहे. ते पाहून या विमा कंपन्या जाणीवपूर्वक आडमुठी भूमिका घेत आहेत. विमा कंपनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत आहे. डिजिटल इंडियाच्या नावानं कागदपत्री घोडे नाचवले जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळू नयेत यासाठी विमा कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असाही आरोप राजू शेट्टी यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *