AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

bacchu kadu: रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. बच्चू कडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर ४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक 'प्रहार', सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
bacchu kadu
| Updated on: Apr 07, 2024 | 12:17 PM
Share

अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. बच्चू कडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागले आहेत. भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर रोज तीव्र शाब्दीक हल्ले ते करत आहेत. आता आणखी एक प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना पाठिंबा बच्चू कडू यांनी दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा गेला आहे.

भाजपशी जळवून घेणार नाही

नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरुन बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेचे उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेल्या बच्चू कडूंनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.

महायुतीत सन्मान नाही…

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांनी लोकसभेसाठी एक जागा मागितली होती. तसेच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नागपूरमध्येही प्रहार जिल्हा कार्यकारिणीची बैठक २ एप्रिल रोजी रामटेक येथे घेतली. त्यात महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही. तसेच राणा दाम्पत्याकडून त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत. त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. त्याची माहिती ३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांना देण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर ४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. हा पाठिंबा फक्त रामटेकपुरताच मर्यादीत असल्याचे प्रहारचे नागपूर जिल्हाध्यक्ष रामेश कारामोरे यांनी म्हटले आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.