एपीएमसीसाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं 'मिशन ब्रेक द चेन', कोरोनाला रोखण्यासाठी अँटीजन टेस्ट

वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 481 वर पोहोचली आहे.

एपीएमसीसाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं 'मिशन ब्रेक द चेन', कोरोनाला रोखण्यासाठी अँटीजन टेस्ट

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे (Rapid Antigen Test In APMC). तसेच, मृतांची संख्याही वाढत आहेत. आज 332 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 481 वर पोहोचली आहे. शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 465 झाली आहे (Rapid Antigen Test In APMC).

ज्या एपीएमसीमुळे शहरात कोरोनाचे रुग्ण पसरले आहेत. त्याला रोखण्यासाठी आता नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ सुरु केलं आहे. त्याचबरोबर विविध उपाययोजना राबवत आहेत. यापूर्वी एपीएमसी प्रशासनाने पाचही बाजारात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करुन सुद्धा बाजार आवारात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अँटीजन टेस्ट

एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अँटीजन टेस्ट सुरु करण्यात आली. अँटीजन टेस्टमुळे आत्तापर्यंत बाजारात 200 पेक्षा जास्त जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत एपीएमसी मार्केटमध्ये अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. मात्र, मार्केट संध्याकाळी 7 पासून सुरु होऊन सकाळी 7 ला बंद होतो (Rapid Antigen Test In APMC).

एपीएमसी मार्केटमध्ये सध्या 400 गाड्याची टोकन देण्यात येत आहे आवक वाढल्याने बाजारात गर्दी वाढली आहे .आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळी पूर्ण मुबई झोपत असतात त्याचवेळी भाजीपाला मार्केट जोरात सुरू होतो , एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला मार्केट हे संध्याकाळी 7 ला सुरु होते. यामध्ये माथाडी कामगार, वाहतूकदार, ग्राहक, व्यापारी मिळून सुमारे 10 ते 15 हजार लोक ये-जा करत असतात. यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 4 पर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

दरम्यान, एपीएमसी मार्केटच्या स्वतःचे आरोग्य विभाग असून सुद्धा आरोग्य विभागाने ही माहिती महानगरपालिकेला दिली नाही. अँटीजन टेस्टची सर्वात जास्त गरज ही भाजीपाला मार्केटमध्ये आहे. वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या लोकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. जर महापालिकेने रात्री भाजीपाला मार्केटमध्ये अँटीजन टेस्ट सुरु केली तर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येईल.

याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. एपीएमसी मार्केटमध्ये आता दोन शिफ्टमध्ये अँटीजन टेस्ट सुरु करण्यात येणार आहे. ज्यामुळे संपूर्ण एपीमसी मार्केट कोरोना मुक्त होणार असल्याची शक्यता आहे (Rapid Antigen Test In APMC).

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात 12 हजार 248 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार

Ganeshotsav 2020 | आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *