नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम; औरंगाबादमध्ये खळबळ

औरंगाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Relatives stay in hospital for corona patients in Aurangabad)

नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम; औरंगाबादमध्ये खळबळ
प्रातिनिधिक छायाचित्रं

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या रुग्णांसोबत रुग्णालयात मुक्काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचं माहीत असतानाही हे नातेवाईक रुग्णांजवळ थांबून सुपर स्प्रेडर बनत असल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Relatives stay in hospital for corona patients in Aurangabad)

औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईक कॉट शेजारी बसून असल्याचं दिसत आहे. नातेवाईकच रुग्णासोबत तास न् तास बसून राहत असल्याने हे नातेवाईक कोरोना स्प्रेडर होण्याची भीती बळावली आहे. जिल्हा रुग्णालयातील जनरल वॉर्डपासून ते आयसीयूपर्यंत नातेवाईकांची गर्दीच गर्दी दिसत आहे. रात्र न् दिवस नातेवाईक रुग्णालयात थांबत आहेत. हे नातेवाईकच कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तर रुग्णालय प्रशासन नातेवाईकांना कोविड वॉर्डमध्ये सोडतातच कसे? असा सवाल केला जात आहे. मात्र, नातेवाईक कोविड वॉर्डात थांबत असल्याच्या वृत्ताने औरंगाबाद चांगलेच हादरून गेले आहे.

म्हणून नातेवाईक रुग्णालयात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना झालेला व्यक्ती रुग्णालयातून परत येईलच याची काहीच शाश्वती नसल्याने औरंगाबादकर भयभीत झाले आहेत. त्यामुळेच डॉक्टर आपल्या रुग्णावर नीट उपचार करणार नाहीत, या भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयात थांबत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, दुसरीकडे नातेवाईकांच्या या वेडगळपणामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Relatives stay in hospital for corona patients in Aurangabad)

 

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | देशभरात 16 कोटी 71 लाख लाभार्थ्यांना कोरोना लस, कोणत्या वयोगटातील नागरिकांना कितपत लाभ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम; जाणून घ्या सरकारचा रिपोर्ट

‘कोविशिल्ड’च्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी रद्द; लसीचा भारतातच वापर करणार

(Relatives stay in hospital for corona patients in Aurangabad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI