कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम; जाणून घ्या सरकारचा रिपोर्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी असल्याचे सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (The second wave of corona will have such an effect on the economy; Know the government report)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम; जाणून घ्या सरकारचा रिपोर्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 7:45 AM

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचीच आर्थिक घडी कोलमडून टाकली आहे. भारतही या आर्थिक संकटातून सुटलेला नाही. देश पहिल्या लाटेत बसलेल्या आर्थिक तडाख्यातून सावरतो तोच दुसरी लाट थैमान घालू लागली आहे. त्यामुळे देशापुढील आर्थिक संकट आणखी भीषण बनण्याची भीती सतावत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी असल्याचे सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (The second wave of corona will have such an effect on the economy; Know the government report)

आर्थिक नुकसानीबाबत सरकारची मासिक अहवालातून कबुली

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे. अर्थ मंत्रालयाने आपल्या मासिक अहवालात अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा ऊहापोह केला आहे. कोविड- 19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम पहिल्या लाटेमुळे झालेल्या परिणामांपेक्षा कमी असेल. दुसऱ्या लाटेमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक व्यवहारांचे नुकसान झाले आहे.

पहिल्या लाटेच्या परिणामांपासून धडा घेऊन सरकारची सावधगिरी

अर्थव्यवस्थेवर दुसऱ्या लाटेचे तुलनेत कमी परिणाम होण्याची काही कारणे आहेत. पहिल्या लाटेचा फटका बसला, त्यापासून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अनेक गोष्टींचा धडा घेतला होता. त्याच अनुभवातून अर्थ मंत्रालय सजग झाले व भविष्यात पुन्हा संकट उभे राहिले तर बचावात्मक पावले टाकण्याच्या दृष्टीने तयारी केली. त्याच सावधगिरीचा देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रतिकार करताना उपयोग झाला आहे, असे सरकारने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सत्रात आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा

गेल्या वर्षी कोरोना महामारीत विविध अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यापासून धडा घेतल्यामुळे आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सत्रात आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे केंद्राची तिजोरी भक्कम बनली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान शुद्ध प्रत्यक्ष कर संकलन अनुमानाच्या तुलनेत 4.5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 5 टक्के अधिक नोंद झाले आहे. यातून कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याचे संकेत मिळत आहेत.

जीएसटी वसुलीत चांगली वाढ

वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या वसुलीत चांगली वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून जीएसटीचे मासिक संकलन 1 लाख कोटींहून अधिक आहे. एप्रिल महिन्यात तब्बल 1.41 लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली. दुसऱ्या लाटेने मात्र आर्थिक आघाडीवर देशाची निराशा केली आहे. शेअर बाजारातील उत्साह मावळला आहे. दुसरीकडे एप्रिल महिन्यात डिजीटल व्यवहारांत वाढ झाली आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून पैशांची देवघेव करण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे. (The second wave of corona will have such an effect on the economy; Know the government report)

इतर बातम्या

‘कोविशिल्ड’च्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी रद्द; लसीचा भारतातच वापर करणार

अक्षय्य तृतीयेवरही लॉकडाऊनचं ग्रहण! ज्वेलर्सनी सोन्याची विक्री करण्यासाठी अवलंबली ही पद्धत

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.