Corona : कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे, दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ

राज्यात दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

Corona : कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे, दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 8:44 PM

कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे आहेत, कारण राज्यात दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. कालही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले होते, देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा अशी स्फोटक आकडेवारी समोर येऊ लागल्याने पुन्हा धाबे दणाणले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ

मुंबईत आज कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाल्याचे समोर आले आहे, कारण एकट्या मुंबईतली आकडेवारी 1377 आहे, त्यामुळे ही गेल्या काही महिन्यातली स्फोटक वाढ आहे. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी तुफान गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपण यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे. राज्यात दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आज दिवसभरात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या 167 वर आहे.

तिसऱ्या लाटेचे संकेत?

एका दिवसातच एवढी रुग्णवाढ झाल्याने हे तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या दोन लाटेत झालेले नुकसान आणि मृत्युचे तांडव पाहता, ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे ही आकडेवारी रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.

Pune | सॉक्टवेअर इंजिनिअरींगच्या तब्बल 28 मुलींना विषबाधा, 6 जणींची तब्बेत खालवली, ससूनमध्ये आणलं!

Ankita patil nihar thackeray wedding : अंकिता पाटील आणि निहार ठाकरेंच्या लग्नाचे फोटो पाहा एका क्लिकवर

Nitesh Rane | अंतरीम जामिनास नकार, अटक अटळ? उद्या ठरणार, कुणाचे वकील ठरले सरस?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.