AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये संपवलं आयुष्य, रीलस्टार रोहिणीने तिथेच…

रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येने मंगळवेढा हादरले आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या रोहिणीने हॉटेल 'ग्रामपंचायत'च्या किचनमध्ये गळफास लावून आयुष्य संपवले. २५ वर्षीय रोहिणीच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि चाहते स्तब्ध झाले आहेत. तिच्या शेवटच्या रीलवर आता शोकसंदेश येत आहेत. व्यवसायाच्या ताणामुळे तिने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ज्या 'हॉटेल ग्रामपंचायत'मध्ये संपवलं आयुष्य, रीलस्टार रोहिणीने तिथेच...
रीलस्टार रोहिणीची शेवटची पोस्टImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 1:40 PM
Share

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात मंगळवारी घडलेल्या घटनेने सर्वच हादरले. सोशल मीडियावर हसत खेळत राहणाऱ्या रील्स बनवून अनेकांचे मनोरंजन करणाऱ्या, लाखो फॉलोअर्स असणाऱ्या रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने तिच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात जे केलं, त्यावर पहिल्यांदा कोणाचाच विश्वास बसेना. अवघ्या 25 वर्षांच्या रोहिणीने तिच्या हॉटेलच्या किचनमध्ये ओढीने गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं.तिच्या या कृतीने तिचा पती, घरचे, कुटुंबीय मुळापासून हादरलेच पण सोशल मीडियावर तिला फॉलो करणारे, तिचे रील्स लाईक करणारे लाखो फॉलोअर्सदेखील हळहळले. याप्ररकरणाचा सध्या तपास सुरू असला तरी तिच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रोहिणी आणि तिचा पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध होतं. “हॉटेल ग्रामपंचायत” या नावाने त्यांचा व्यवसाय तर होताच, पण सोशल मीडियावरही ते या हॉटेलमधून वेगवेगळे रील्स टाकायचे. त्या किचनमधील रील्स लोकांना खळखळून हसवायचे. मंगळवारी रोहिणीने जीवन संपवलं. मात्र त्यापूर्वी तिने सोशल मीडियावर जी शेवटती पोस्ट , जे रील टाकलं तेही त्याच हॉटेल ग्रामपंचायतमधीलच होतं, जे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मात्र आता तिच्या मृत्यूनंतर याच पोस्टवर अनेक कमेंट्स येत असून तु असं का केलंस, असाच सवाल त्यांचे लाखो फॉलोअर्स विचारत आहेत. रोहिणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ज्या हॉटेलमध्ये संपवल जीवन तिथूनच शेवटची पोस्ट

रोहिणी आणि निलेश यांचा आंतरजातीय प्रेमविवाह असून दोघंही आधी पुण्याला राहत होते. तिथेही ते रील्स बनवायचे, नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्यावर ते मंगळवेढा तालुक्यातील मूळ गावी गेले आणि तिथेच त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हे सुरू केलं. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांच्याही शेकडो पोस्ट आहेत, ज्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्यात. 26 मे रोजी रोहिणीने ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्येच आत्महत्या केली, मात्र त्याच हॉटेलच्या किचनमधलं तिचं आणि तिच्या पतीचं शेवटचं रील समोर आलं आहे.

शेवटचं रील व्हायरल

या शेवटच्या रीलमध्ये ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये रोहिणी भाकऱ्या थापताना दिसली. हे रिल तिने तिच्या नवऱ्यासोबत तयारा केलं होतं, थोडसं मजेशीर असं हे रील. यात नवरा-बायकोचो गमतीशीर संवाद आहेत. त्यांचं हे लाडीक भांडण रीलमधून दिसलं, ज्यावर लाईक्स आले होते. मात्र आता रोहिणीच्या मृत्यूनंतर यावर अनेक शोकसंदेश आले आहेत. खरच व्यक्ती रिल मध्ये किंवा फोटो मध्ये जेवढा हसून खेळून असतो तेवढी त्याच्या खऱ्या आयुष्यात नसतो… , असं एकाने यात कमेंटमध्ये लिहीलं आहे. भाऊ तू कस जावू दिल एवढ्या छान बायकोला ? असा सवालही एकाने कमेंटमधून विचारला.

रोहिणी आणि निलेश यांचं हॉटेल चांगलं चालत होतं, मात्र त्याच्या शाखा वाढल्या आणि यातून निर्माण झालेला तणाव आणि त्यातमुळे झालेल्या वादामुळे रोहिणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं असावं असा अंदाज व्यक्त होत आहे.

Follow Us
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...