AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट आणि… रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूचं कारण समजणार? पोलिसांनी चक्रे फिरवली

रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तिचं हसतंमुख आयुष्य दिसलं तरी, 'दिसतं तसं नसतं' या म्हणीचा प्रत्यय तिच्या मृत्यूने आला. आभासी जगामागील खरं वास्तव काय होतं, हे शोधण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत, तिच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला आहे.

मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट आणि... रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूचं कारण समजणार? पोलिसांनी चक्रे फिरवली
| Updated on: May 29, 2026 | 4:05 PM
Share

दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं… सोशल मीडियाचा वापर वाढला आणि आभासी जगात लोकं जास्तच रमायला लागले. सोशल मीडियावरचे रीलस्टार जे दाखवतात, जे आयुष्य जगतात, ते त्यांच खरं आयुष्य आहे असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं असेलचं नाही. कॅमेऱ्यासमोर हसतमुखाने वावरणारी माणसं नेहमी खुशच असतात असं नाही, त्यांच्या हास्यामागे काहीतरी दडलेलं असू शकतं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स, शेकडो रील्स, मजेशीर व्हिडीओ , गावरान भाषेचा ठसका, ते बोलत लोकांचं मनोरंजन करणारी रीलस्टार म्हणून रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश हे दोघे प्रसिद्ध होते.

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गावात त्यांचं हॉटेल खूप गाजत होतं, पण तेच हॉटेल आता वेगळ्या कारणांनी चर्चेत आलं. त्याच हॉटेलमध्ये तिने आयुष्याचा शेवट केला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून तिचे फॉलोअर्सही हळहळ व्यक्त करत आहेत.

रोहिणी आणि निलेश पाराध्ये यांच्या अकाऊंटवर जवळपास 875 पोस्ट असून 3 लाखांपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. अथक मेहनतीने चाललेलं त्यांचं हॉटेल ग्रामपंचायत यशस्वीपणे सुरू होतं, धंदा चांगला सुरू होता. ते दोघे चांगलेच लोकप्रिय होते, त्यांचा व्यवसायही वाढत होता. वरून सगळं एवढं चांगलं दिसत असताना, अवघ्या 25 वर्षांच्या रोहिणीच्या आयुष्यात असं काय घडलं की, तिने सगळं सोडून देत, मागचा पुढचा जराही विचार न करता स्वत:ला गळफास लावून घेत आयुष्य संपवलं? असा प्रश्न तिचे घरचे, कुटुंबीय आणिलाखो लोकांच्या , फॉलोअर्सच्या मनातही आहे.

त्या दिवशी काय घडलं ?

मंगळवार, 26 मे रोजी दुपारी रोहिणीने तिच्या हॉटेल ग्रामपंचायतमध्ये ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. मात्र या दुर्दैवी घटेनच्या आधीच थोडा वेळ ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह हती, तिचं शेवटचं रील अजूनही तिच्या अकाऊंटवर असून अनेकांनी त्यावर तेव्हा कमेंट्स केल्या. तर आता तिच्या जाण्यानंतर अनेक तिला श्रद्धांजली वाहत, एवढा मोठा , टोकाचा निर्णय का घतेला असे प्रश्न कमेंटमधून देखील विचारले आहेत. त्यावरून तिची लोकप्रियता दिसून येते.

पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रं

दरम्यान रोहिणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली असून तिच्या या कृतीमागचं कारण शोधण्यात पोलिस व्यस्त आहेत. पोलिसांनी रोहिणी-निलेशच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये काही घडलं होतं का हे पडताळून पाहिलं जाणार आहे. तसेच रोहिणीचा मोबाईल, तिचे कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

आत्महत्येपूर्वी रोहिणीने कोणाशी संपर्क केला होता, तिचं कोणाशी बोलणं झालं होतं का, तिला कसला मानसिक तणाव होता का, आत्महत्येसारखं एवढं मोठं टोकाचं पाऊल तिने का उचललं? या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.

तिचा नवरा, नातेवाईक, हॉटेलमध्ये काम करणारी माणसं, तिच्या मैत्रिणी, अशा सर्वांना प्रश्न विचारण्यात येणार असून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येतील. त्यातून काही धागेदोर मिळतात का हेही पोलिस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक