AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ईडापिडा टळो, लोकशाही बलवान होवो’; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन भुजबळांची फटकेबाजी

महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्ष राजधानीत संघर्ष करणाऱ्या बळीराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागले आहे. फुले म्हणायचे ईडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. आता लोक म्हणतात, ईडापिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो', अशी फटकेबाजी भुजबळांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन केली.

'ईडापिडा टळो, लोकशाही बलवान होवो'; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन भुजबळांची फटकेबाजी
छगन भुजबळ, स्वागताध्यक्ष, 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 8:41 PM
Share

नाशिक : ‘महात्मा फुले यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे (Literary convention) निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे’, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मान्यवरांचे आणि रसिक प्रेक्षकांचे स्वागत केले. महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्ष राजधानीत संघर्ष करणाऱ्या बळीराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागले आहे. फुले म्हणायचे ईडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. आता लोक म्हणतात, ईडापिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो’, अशी फटकेबाजी भुजबळांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन केली.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी छगन भुजबळ, प्रमुख पाहुणे म्हणून गीतगार जावेद अख्तर, मराठी भाषा विभाग आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोतापल्ले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आदी उपस्थित होते. तर साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो, संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबवली पाहिजे’

मराठी भाषेची होणारी गळचेपी, हेळसांड आपण थांबविली पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम असते तसेच भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी लावण्यवतीचे वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडा मराठीतच रचला आणि गायला जातो. आपण मराठी भाषा बोलतो म्हणजे आपण सांस्कृतिक आदानप्रदान करत असतो, असं भुजबळ म्हणाले.

‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’

त्याचबरोबर ‘मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला सोहळा आहे. त्याला सारस्वतांचा मेळा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. 1942 च्या साहित्य संमेलनात ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’ याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1960 सालीच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो. आमचे नेते शरद पवार हे स्वतः अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. आतापर्यंत चार संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. त्यांची भाषणे साहित्य मंचावर कधीच राजकीय स्वरूपाची नसतात. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केवळ राजकीय चर्चा केली नाही तर मराठी साहित्यातील रससिद्धांतावर त्यांनी भाष्य केले होते. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबर्‍या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढार्‍याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चु्कता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन’, असं आश्वासन यावेळी भुजबळांनी साहित्यिकांना दिलं.

‘फुलेंनी लिहिलेला शेतकर्‍यांचा आसूड आजही कडाडतो आहे’

महात्मा फुलेंनी लिहिलेला शेतकर्‍यांचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्षे राजधानीत संघर्ष करणार्या बळिराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागलेले आहे. फुले म्हणायचे इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. आता लोक म्हणतात, ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो. शाहु महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रांचा महाग्रंथ राज्य शासनाने 21 व्या खंडाच्या रुपाने प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. त्यांनी सयाजी विजय मालेतून प्रकाशित केलेले बुद्धचरित्र वाचून बाबासाहेब बुद्धाकडे वळले. त्यांनी या मालिकेत प्रकाशित केलेली 300हुन अधिक पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हवीत असे माझे मत आहे. इतकी ती मोलाची आहेत. त्यांनीच 1905 साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे, सार्वत्रिक आणि मोफत केले. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.

‘साहित्य संस्कृतीतील सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा ही अपेक्षा’

महात्मा फुले यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे. हा बदल लक्षात तर घ्याल की नाही? नारळीकर- ठालेपाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहेत. हा काळ आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा आहे. आम्ही नाशिककरांनी तुमच्यासाठी सर्व स्वागताची तयारी केली आहे. त्यातून कुठे काही उणे भासल्यास ते आमचे आहे. ते आमच्याकडे देऊन जा. या साहित्य सोहळ्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी दूरवरून आलेले आहेत. त्यांनी साहित्य संस्कृतीतील सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा एवढीच माझी अपेक्षा आहे, असं भुजबळ म्हणाले.

इतर बातम्या : 

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच, नाना पटोलेंकडून स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनाही प्रत्युत्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.