AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी…; मविआची पहिली प्रतिक्रिया

Ambadas Danve on Ashok Chavan Resigns from Congress : अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम; महाविकास आघाडीतून पहिली प्रतिक्रिया... अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्यानं नेमकं काय म्हटलं? वाचा...

अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी...; मविआची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Feb 12, 2024 | 2:57 PM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 12 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. तसंच त्यांनी भाजपवरही टीकास्त्र डागलंय. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं.

अंबादास दानवे यांची सविस्तर प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे. भाजपाची ताकद क्षीण झालेली आहे म्हणून भाजप असं काम करत आहे. म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांची गरज भासते आहे. अशोक चव्हाण ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत हे मानले पाहिजे. कोणतीही आघाडी किंवा पक्ष एका व्यक्तीवर चालत नसतो. कोणाच्या आल्याने आणि गेल्याने पक्ष संपत नसतो अशी अनेक उदाहरणं आहेत. भाजप ही 2 वरून 300 वरती गेली आणि काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळात नेस्तनाभूत होऊन पुन्हा उभी राहिली आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा

उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेसाहेबांचा आज जनसंवाद मेळावा आहे, मोठी जाहीर सभा नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदार संघात आज मेळावा आहे. शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. संभाजीनगर ही शिवसेनेची ताकद, शक्ती आणि ऊर्जा राहिलेली आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या, पण…- दानवे

केवळ पंकजा मुंडे यांचाच मतदारसंघ राहिलेला नाही असे नाही तर अनेकांना मतदारसंघ राहिलेला नाही. केवळ पंकजा मुंडे यांच्यावरच नव्हे तर एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अन्याय झाला. पंकजा मुंडे या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या पार्टी सोडून दुसरीकडे जातील असे नाही, असं असं म्हणत अंबादास दानवे यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.