Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: शहराच्या उत्तर पूर्वेत कोणत्या पक्षाचा उदय? कोणते सूर्य तळपले, यादीच वाचा
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : छत्रपती संभाजीनगरची स्थापनचा मुळात मलिक अंबर या आफ्रिकन गुलामाने त्याच्या कर्तृत्वावर केली. तो उत्तरेतून भारतात आला. त्यामुळे दिल्ली गेट आणि पुढील उत्तरेतील परिसर तर पूर्वेतील परिसर या शहराची एक खासियत आहे. या भागात मतदार कुणाचा झेंडा हाती घेणार याचं उत्तर आज मिळणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगरचे तोंड पूर्वी नेहमी उत्तरेकडे होते असे म्हटल्या जाते. कारण दिल्लीतील घाडमोडींचे परिणाम या शहरावर होत होते. दिल्ली दरवाज्यातून राजकीय, लष्करी खलित्यातून दख्खनचे राजकारण ठरत होते. त्यामुळे या शहरातील दिल्ली गेट आणि पुढील उत्तरेतील भाग आणि पूर्वेतील परिसर या शहराच्या राजकारणावर विशिष्ट छाप सोडतो.विशेष म्हणजे या भागात कामगार राहत होते. आज या परिसराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. कामगारांची मुलं कुठं मालक, तर कुठं मोठ्या हुद्दावर आहेत. याभागात पार अकोल्यापासून ते धुळ्यापर्यंत आणि दख्खनमधील परभणी,नांदेड,लातूर, धाराशिव, सोलापूरातील अनेक संसार थाटले आहे.
यावेळी शहरासाठी 29 प्रभाग आहेत आणि 115 नगरसेवक शहराचं प्रतिनिधित्व करणार आहेत. उत्तरेसह पूर्वेत आता फार बदल झाला आहे. मुस्लिमांसह अनुसूचित जाती, जमाती, हिंदूंची दाट लोकसंख्या आणि नागरी समस्या कमी झालेल्या नाहीत. नवीन वसाहतींना पाण्यापासून, ड्रेनेज, रस्त्यांच्या मूलभूत समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे येथील प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाक क्रमांक 08
हर्सूल टी पाईंटपासून पूर्वेकडील युनिकॉर्न ग्लोबल प्री स्कूलपासून हा प्रभाग क्रमांक 08 सुरु होतो. मयुरपार्क, ऑडीटर सोसायटी, सिद्धेश्वर नगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्त नगर, सुजाता सोसायटी, नाथनगर, सुरेवाडी, वसंतनगर, एसटी कॉलनी, गोकुळनगर, सिद्धेश्वरनगर,कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा, एमआयडीसी चिकलठाणा, सनी सेंटर, राठी संसार, आरती नगर, आंबेडकर नगर, फुलेनगर, गौतम नगर, जाधववाडी,रामकृष्ण सोसायटी या वसाहतीचा यामध्ये समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 09
प्रभाग क्रमांक 09 ची लोकसंख्या 39,741 इतकी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 16,525, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 283 इतकी आहे. आरती नगर,मिसारवाडी,नारेगावधील नॅशनल कॉलनी, अशोक नगर, मसनतपूर,ब्रिजवाडी, उत्तरानगरी, शहानगर, दिनानगर, चिकलठाण्याचा काही भाग याचा समावेश होतो.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
प्रभाग क्रमांक 10
या प्रभागाची लोकसंख्या 40,979 इतकी आहे. तर यामध्ये अनुसूचीत जातीची संख्या 5,875, अनुसूचीत जमातीची संख्या 643 इतकी आहे. गुलमोहर कॉलनी, सत्यम नगर, अयोध्या नगर, एमआयडीसी चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, बजरंग कॉलनी, टेलिकॉम सोसायटी, आनंद इमारत, बजरंग चौक, टाऊन सेंटर, एन -१ सिडको, गरवारे स्टेडियमचा यामध्ये समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 11
या प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकूण लोकसंख्या 38,750 इतकी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 4873, अनसुचित जमातीची संख्या 510 इतकी आहे. गणेशनगर, अविष्कार कॉलनी, एन-6, हत्तेसिंगपूरा, सिंहगड कॉलनी, शुंभश्री कॉलनी, साईनगर, चिस्तिया कॉलनी, जिव्हेश्वर कॉलनी,वैशाली नगर याचा यामध्ये समावेश आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
