संजय राऊत, तुम्ही तर शरद पवारांचे दलाल…!; कुणाचं विधान?
Sanjay Shirsat on Sanjay Raut :
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचं वृत्त द हिंदूमध्ये प्रसारित झाली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनीही यावर भाष्य केलं. अजित पवार हे एकनाथ शिंदेंपेक्षा वरिष्ठ नेते आहेत. अनुभवाच्या आधारावर त्याचं मुख्यमंत्रिपदावर हक्क तर बनतोच… कारण त्यांनशिंदे पेक्षा जास्त बेईमानी अजित पवार यांनी देखील केली आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांवर निशाणा
अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे पाहू पण तुम्ही शरद पवारांच्याकडे वाऱ्या करून थकले आहात. तुम्ही शरद पवारांचे दलाल आहात. तुम्ही उद्धव ठाकरे यांचे नाव तरी पुढे जोडा…, अशा शब्दात संजय शिरसाटांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. -अजित पवार यांनी काय केलं काय नाही केलं, याकडे संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाने लक्ष देऊ नये…. यांची गत ‘ना घर का ना घाट का…’ अशी झालेली आहे. यांना महविकास आघाडीत कुणी महत्व देत नाही, असंही शिरसाट म्हणाले.
निवडणुकीवर काय म्हणाले?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी काही सर्व्हेमधून आकडेवारी समोर येत आहे. यावरही संजय शिरसाटांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात जसे विधान सभेचे वारे वाहतात तसे सर्व्हे समोर येत आहेत. बऱ्याच संस्था राजकीय पक्षांनी हायर केलेल्या असतात त्यामुळे ते नेत्यांकडून सर्व्हे बनवतात. काल महाविकास आघडीला विजय मिळणार असे म्हणले असता तो सर्व्हे खरा असेल की नाही हा प्रश्न आहे. हम बने तुम बने असे सर्व्हे बनवले गेले आहेत. नाराजी आणि युती तसेच होणाऱ्या घडामोडींवर होणारा सर्व्हे हा खरा असेल. आमची युती चांगल्या पद्धतीने पार पडेल,गणपती झाल्यावर आमच्या युतीची घोषणा होईल. येणारी सत्ता ही महायुतीची हा आमचा दावा आहे, असंही शिरसाटांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. काश्मीरला जायला यांना भीती वाटत होती. मोदी सरकारने काय केलं याचं उत्तर आहेत. गृहमंत्री असताना हे घाबरत होते मात्र मोदी यांनी जे केलं त्यामुळे परिवर्तन केलं. सुशील कुमार शिंदे यांना त्यांच्या लोकांनी काम करू दिले का ? त्यांच्याकडे असणाऱ्या पॉवरचा वापर करू दिला का?, असं शिरसाट म्हणाले.