AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ दोन समाजात भांडणं लावतायेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजे आक्रमक

Sambhajiraje Chhatrapati on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत... दोन समाजात भांडणं लावतायेत, त्यांची भूमिका तीच सरकारचीही भूमिका आहे का?, असा थेट सवाल संभाजीराजे यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून भुजबळांवर निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ दोन समाजात भांडणं लावतायेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजे आक्रमक
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 18, 2023 | 11:03 AM
Share

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि त्यातून आरक्षण मिळालं तर तो ओबीसींवर अन्याय असेल, असं म्हणत त्यांनी ओबीसी महासभा घेतली. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे.

संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट तशीच्या तशी

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.

सोलापुरात भुजबळांचा निषेध

मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरात छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील मालवंडी गावामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला गेला. छगन भुजबळ यांनी यापुढे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाला दिला आहे.

” भुजबळांची नार्को टेस्ट करा”

छगन भुजबळांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार करणार आहे. छगन भुजबळांची पोलीस चौकशी करा. बीडची जाळपोळ ही छगन भुजबळांनी करायला लावली. त्यांनी मराठा समाजसाठी बदनामीचा कट रचला आहे. त्यांची नार्को टेस्ट करा आणि गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समन्वयक योगेश केदार हे पोलीस महासंचलकाकडे करणार आहेत.

संभाजीराजे मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार

छत्रपती संभाजीराजे आज राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भेट घेणार आहेत. आयोगाच्या कार्यालयात ही भेट होणार आहे. आधी मागासवर्गीय आयोगात जाऊन संभाजीराजे भेट घेणार आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीत आयोगाचं कार्यालय आहे. तिथं ही भेट होईल. नंतर मागासवर्ग आयोगाची पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊसला बैठक होणार आहे.

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा