ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर करताच मविआत वादाची ठिणगी; काँग्रेस नेते दिल्लीत दाखल

Congress Leader Vishwajeet Kadam Vishal Patil in Delhi to Meet Mallikarjun Kharge : ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर होताच काँग्रेसमधून नाराजीचा सूर; पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेसाठी दिल्लीत दाखल... कोणत्या जागेवरून वाद. महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर करताच मविआत वादाची ठिणगी; काँग्रेस नेते दिल्लीत दाखल
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 12:30 PM

शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 17 जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. यात सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून महाविकास आघाडीत नाराजी पाहायला मिळतेय. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी आल्याचं पाहायला मिळतंय. विश्वजित कदम आणि सांगली काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालंय. आज दुपारी घेणार पक्षश्रेष्ठींची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत.

काँग्रेस नेते दिल्लीत दाखल

आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जाऊन मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणूगोपाल यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांची संध्याकाळीपर्यंत भेट होणार आहे. वरिष्ठांच्या भेटीनंतर विश्वजीत कदम चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळण्यावर सांगलीतील काँग्रेसचे नेते ठाम आहेत. सोनिया गांधींच्या भेटीनंतर सांगलीत उद्या येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी माहिती दिली आहे.

सांगलीच्या जागेवरून वाद

सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरेगटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच चंद्रहार पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसमध्ये नाराजी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नाराजी संपणार का? चंद्रहार पाटील यांची आता या पुढची भूमिका काय असणार त्यांच्यासमोर काय आव्हान असतील? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही नाराज?

संजय राऊत यांनी परस्पर उमेदवार यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत नाराजी पाहायला मिळत आहे. वादग्रस्त जागांबाबत आज बैठक होण्यापूर्वीच राऊत यांनी यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांच्यासह मविआचे अनेक नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार होती. नाशिकसह इतर जागांबाबत आज बैठक होणार होती. या बैठकीच्या आधीच केल्याने राऊतांवर यादी जाहीर केल्याने मविआमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.

Non Stop LIVE Update
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.