रावणाची लंका पेटवून खाक केली, खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका, नेमका कोणाकडे रोख ?
खासदार विशाल पाटील यांनी स्वर्गीय आर.आर. पाटील यांचे पूत्र रोहीत पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदार संघात अजित घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

रावणाचा दहन करण इतक सोपं नव्हतं, पण रावणाची लंका पेटवून खाक केली अशी टीका अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केली आहे.यावेळी विशाल पाटील यांनी आगामी तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणूकीत माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धारही जाहीर केला आहे.त्यामुळे खासदारीसाठी सहा विधानसभा मतदार संघात मदत करणाऱ्या रोहित आर. आर. पाटील यांची अडचण झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्यं विशाल पाटील यांनी करू नयेत स्वतःला आवरावे असा पलटवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला आहे.
लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाच्या निमित्ताने तासगावच्या मनेराजुरी येथे विशाल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यानिमित्ताने शेतकरी मेळावा देखील झाला. या मेळाव्यात खासदार विशाल पाटील यांनी रावणाचा दहन करणं इतक सोपं नव्हतं, पण रावणाची लंका पेटवून खाक केली असे वक्तव्य केले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात अजित घोरपडें सरकार शिवाय पर्याय नाही असेही ते यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत एका अपक्षाने राक्षसस्वरूपी खासदाराचा पराभव केला तरी आता विधानसभा निवडणुकीची तयारी करताय, पण या राक्षसाला पाडायचे असेल तर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दात विशाल पाटल यांनी अजित घोरपडे यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित आर. आर. पाटील यांनी विशाल पाटील यांना केलेल्या मदतीची परतफेड कशी करणार असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वतःला आवरावे
विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्यं करू नये स्वतःला आवरावे. विशाल पाटील यांचे कर्तृत्व नाही, पण विश्वजित कदम यांची स्वतःची अशी ओळख आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी विशाल पाटील यांना एकदा विचारा की तुम्ही अपक्ष आहात की कॉंग्रेसचे सहयोगी आहात असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला आहे.
