AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : तर आम्हीच पंतप्रधानांचा सत्कार केला असता – संजय राऊत

राहुल गांधी यांनी बोलावलेल्या युपीए बैठकीमुळे भयभीत झालेले नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली. संजय राऊत यांनी टीका करत खोचक टोला लगावला. पीओकेबद्दल मोदींच्या वचनांची देखील त्यांनी आठवण करून दिली.

Sanjay Raut : तर आम्हीच पंतप्रधानांचा सत्कार केला असता - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2025 | 10:17 AM
Share

लाहोर, कराची , बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके घेणार असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया देतानाच राऊत यांनी मोदींवरही टीका केली.

7 तारेखला दिल्लीमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या निवासस्थानी यूपीएची, इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आहे. आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित असतील. आता आमच्या बैठकीमुळे बहुतेक त्यांच्या (नरेंद्र मोदी) मनामध्ये भय निर्माण झालं, त्यामुळे मोदीजींनी आज एनडीएची बैठक बोलावली. त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या बैठकीवर परिणाम होणार नाही असं राऊत म्हणाले.

त्या आजच्या बैठकीत मोदींचा सत्कार होणार आहे, असंही मला कळलं, तो कशाकरता, सप्टेंबरमध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी रिटायर होत आहेत ? की आणखी कशाकरिता एनडीएची लोकं त्यांचा सत्कार करणार आहेत ? असा सवालही राऊतांनी विचारला.

आम्हीच सत्कार केला असता..

खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं, आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनीसुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. देशातील पंतप्रधानांनी जे सांगितलं ते करून दाखवलं, आता पीओक घेणार असं राजनाथ सिंग म्हणाले, अमित शहा, मोदी म्हणाले. पण आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधि मिळाली नाही याबद्दल आम्हाल दु:ख आहे अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.  मोदी घोषणा करून देशाचं वाटोळं करतात असा हल्ला राऊतांनी पंतप्रधानांवर चढवला.

कलम 370 वरून भाजप अपयशी ठरलं आहे

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवून काहीच बदललं नाही, 6 वर्षांत काश्मीरमध्ये काहीही बदललं नाहीये. भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी तिथे भारतीय घटनेनुसार कोणतही काम होत नाही. भारतीय नागरिक तिथे जाऊन आजही जमीन खरेदी करू शकलेला नाही. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचं जे स्वप्न मोदींनी दाखवलं होतं, ते आजही तिथे पूर्ण झालेलं नाही, काश्मीरच्या जनतेला, तरूणाना रोजगार मिळालेला नाही, तिथला हिंसाचार, दहशतवाद थांबलेला नाही ,22 एप्रिलला पहलगाममध्ये काय झालं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे.  सरकार जरी तिथे लोकशाही मार्गाने निवडून आलं तरी त्या सरकारला कोणतेही अधिकार नाही, ते राज्य केंद्रशासित झालेलं आहे, त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आवश्यक आहे. 370 नंतर फक्त मोदी, शहा आणि त्यांच्या भाजपाने स्वत:चे ढोल वाजवून घेतले अशी टीकाहीव राऊतांनी केली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.