‘मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,’ राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'मोदींच्या महाराष्ट्रात प्रचंड सभा झाल्या, 15 हजार खुर्च्यांपैकी 14 हजार रिकाम्याच होत्या,' राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 9:52 PM
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जोरदार प्रचार सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेमधून भाजप आणि पंतप्रधान मोदी  यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? 

शिवसेनेच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, दीड हजार ही रक्कम आहे का? आपण परवा महालक्ष्मी योजना जाहीर केली, महिन्याला ३ हजार, महिलांना राज्यभरात मोफत प्रवास, मानसन्मान राहील अशा या योजना आहेत. सिलींडर १४०० रुपयांना आणि २५ लाखांचा विमा याला राज्य चालवणे म्हणतात का? योजना यासाठी सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार दिवसांपासून राज्यात आहेत, प्रचंड सभा झाल्या. 15 हजार खुर्च्या होत्या, त्यातल्या 14 हजार रिकाम्या होत्या, असा खोचक टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये मोदी होते, नेहमीप्रमाणे थापा मारून गेले, राज्याला कटांळाला आला आहे. फडणवीस यांनी कशा थापा मारल्या हे कराड यांनी सांगितलं. हे शहर दत्तक घेतले त्यांनी पोटचा मुलगा सोडा, सावत्र मुलाप्रमाणे सुद्धा सांभाळ केला नाही नागपूरमध्ये सुद्धा यांना रोजगार ठेवता आला नाही. सगळ्याचा हिशोब करू, या राज्यातून हे विष गेलं पाहिजे. त्यांनी कुठे आणलं अमृत समुद्र मंथन केले का ? तिकडे कमला हरल्या इकडे कमळबाई हरणार. दहा वर्षांत चुका केल्या ती सुधारण्याची वेळ आली आली आहे, असं राऊत यांनी म्हटलं.  तसेच यावेळी बोलताना त्यांनी महविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयी करा असं आवाहान देखील केलं.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.