AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime : महिलेनं चोराला दाखवला इंगा! साताऱ्यात गाडी पळवण्याचा चोरट्याचा प्रयत्न चिमुकल्याच्या आईमुळं फसला

अॅड. महेश गोरे आणि त्यांची पत्नी जयश्री गोरे हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह शिखर शिंगणापुरहून पुसेगाव मार्गे साताऱ्याला येत होते. पुसेगावमध्ये रात्री पाणी घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. यावेळी महेश गोरे हे गाडीतून उतरुन पाणी घेण्यासाठी गेले होते. याचदरम्यान तेथे दबा धरुन बसलेल्या चोरट्याने लगेच गाडीत बसून गाडीच 'हायजॅक' केली.

Satara Crime : महिलेनं चोराला दाखवला इंगा! साताऱ्यात गाडी पळवण्याचा चोरट्याचा प्रयत्न चिमुकल्याच्या आईमुळं फसला
महिलेनं चोराला दाखवला इंगा!Image Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 27, 2022 | 5:23 PM
Share

सातारा : साताऱ्यातील पुसेगावमध्ये महिला आणि बाळासह 25 जून रोजी कार (Car) पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र कारमधील वकील महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे अवघ्या काही मिनिटात चोरट्यांच्या तावडीतून त्यांची सुटका (Rescued) झाली आहे. आई आपल्या बाळासाठी मोठ्यातल्या मोठ्या संकटाला तोंड देऊ शकते हेच या प्रसंगातून दिसून आलं. सुमारे 5 ते 7 मिनिटं चाललेल्या या झटापटीमध्ये बाळासाठी आईने केलेला प्रतिकार हा महत्वाचा होता. चोरट्याला पुसेगाव पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अभिजीत फडतरे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पुसेगावजवळ गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न

अॅड. महेश गोरे आणि त्यांची पत्नी जयश्री गोरे हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह शिखर शिंगणापुरहून पुसेगाव मार्गे साताऱ्याला येत होते. पुसेगावमध्ये रात्री पाणी घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. यावेळी महेश गोरे हे गाडीतून उतरुन पाणी घेण्यासाठी गेले होते. याचदरम्यान तेथे दबा धरुन बसलेल्या चोरट्याने लगेच गाडीत बसून गाडीच ‘हायजॅक’ केली. विशेष म्हणजे या हायजॅक केलेल्या गाडीत महेश गोरे यांची पत्नी अॅड जयश्री गोरे आणि त्यांचं 4 महिन्यांचं बाळ तसेच त्यांची भाची होती. चोरट्याने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. चोरटा गाडी जोरदार वेगात साताऱ्याच्या दिशेने पळवून नेत होता. यावेळी जयश्री फडतरे यांनी लगेच हॅण्डब्रेक ओढला. मात्र तरी सुद्धा या चोरट्याने गाडी जोरात चालवत त्यांना शांत बसा नाही तर मारुन टाकेन अशी दमदाटी केली.

अवघ्या काही मिनिटात महिलेने चोराला सळो की पळो केले

अशा परिस्थितीतही 4 महिन्यांचं बाळ मांडीवर घेऊन जयश्री गोरे यांनी त्याला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत बाळ मांडीवरुन खाली पडलं. मात्र गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या भाचीने बाळ लगेच उचललं‌. बाळ सुखरुप आहे हे पाहताच जयश्री यांनी त्या चोरट्याला अजून जास्त जोराने प्रतिकार करत पुन्हा लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत गाडी बाजूच्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन थांबली. यामुळे गांगरलेल्या आरोपीने दार उघडून तेथून पळ काढला. काही वेळाने जयश्री यांचे पती महेश गोरे हे काही स्थानिकांना घेऊन गाडीजवळ पोहचले. मात्र तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. या घटनेबाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. अभिजीत फडतरे असे या चोरट्याचे नाव असून तो पुसेगाव जवळील नेर फडतरवाडीतील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. (Attempt to hijack car foiled in Satara, thief arrested by police)

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ