मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना या प्रकरणावरून ठणकावून सांगितले; टीका करणाऱ्यांना एकाच वाक्यात दिलं उत्तर…

बारसू प्रकरणावरून आता सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. त्यामुळे बारसू प्रकरणावर राज्यातील राजकारण आता आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना या प्रकरणावरून ठणकावून सांगितले;  टीका करणाऱ्यांना एकाच वाक्यात दिलं उत्तर...
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 10:38 PM

दरे / सातारा: राज्यात एकीकडे बारसूतील आंदोलन चिघळले असून दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर असल्याचे टीका विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांनी आज भर उन्हात आंदोलन केले असले तरी त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा डाव या सरकारने केले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. बारसूतील आंदोलकांना दहशतवाद्यासारखी वागणूक दिल्याचा घणाघातही सरकारवर करण्यात आला. त्यावरून आता राजकारण तापले आहे.

एकीकडे हे आंदोलन चिघळले असून दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यामुळेच मुख्यमंत्री रजेवर असल्याचे समजते आहे, अशी खोचक टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सुट्टीवर नव्हे तर सध्या डबल ड्युटीवर असल्याचे विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

बारसूचे आंदोलन चिघळल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली.

त्यावरून आपल्या मूळगावी गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

बारसूच रिफायनरी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना ठणकावून सांगत त्यांनी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घरी अडीच वर्षे बसणाऱ्यांनी दोन तीन दौऱ्यावर असणाऱ्यांबद्दल बोलू नये असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. बारसू प्रकरणावरून आता सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. त्यामुळे बारसू प्रकरणावर राज्यातील राजकारण आता आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.