PUNE SATARA मार्गावरील खेड शिवापूर टोल प्रकरण तापलं, हटाव कृती समिती आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पुणे ((PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरील टोल वसुली वरून खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे.

PUNE SATARA मार्गावरील खेड शिवापूर टोल प्रकरण तापलं,  हटाव कृती समिती आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा
कृती समितीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन देण्यात आलं आहेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:02 AM

पुणे – पुणे (PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरील टोल वसुली वरून खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे. टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करून, टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खेड शिवापूर कृती समितीने केली आहे. संबंधित प्रकरणाची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (SANJAY KADAM) यांना दिला आहे. टोल नाका हटाव कृती समिती प्रचंड आक्रमक झाली असून कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरू शकते अशी माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. तीन वर्षापुर्वी देखील आंदोलन करण्यात आलं होतं. पण मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.

कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम एच 12 आणि एम एच 14 या वाहनांची टोलमाफी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झाल्याने ही टोलमाफी बंद केली आहे. 1 मार्च पासून या वाहनांना टोल आकारण्यात येत असल्याची माहिती,एनएचएआयकडून सांगण्यात देण्यात आली आहे. पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावी. खेड शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’च्या हद्दीबाहेर हलविण्यात यावा. या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी या मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली पुणे शहर पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन एनएचएआयकडून देण्यात आलं होतं.

मात्र 1 मार्च 2022 टोल आकारण्यास सुरूवात झाल्याने कृती समिती आक्रमक

तेव्हापासून खेड शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल आकारण्यात येत नव्हता. मात्र 1 मार्च 2022 पासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम.एच.12 आणि एम.एच.14 या वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती, खेड-शिवापूर टोलनाका पीएमारडीए हद्दीबाहेर हलविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्या संबंधिचं पत्र कृती समितीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन देण्यात आलं आहे.टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कृती समितीकडून देण्यात आलाय.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?

Chandrapur | गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रात्रीच्या गस्तीवर, 8 लाख रुपयांचा दंड वसूल

Nagpur | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबीर

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.