Video : ‘ती’ दोन पिल्ल अखेर मादी बिबट्यापर्यंत पोहोचली, अशी झाली आई-मुलांची भेट

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शिवारात शनिवारी रोजी उस तोड सुरु असताना उसतोड कामगारांना अंदाजे पंचवीस ते तीस दिवसाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले.

Video : 'ती' दोन पिल्ल अखेर मादी बिबट्यापर्यंत पोहोचली, अशी झाली आई-मुलांची भेट
पिलांसाठी आईची धडपडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 4:41 PM

कराड, सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara) कराड तालुक्यातील (Karad) भोळेवाडी येथील शिवारात शनिवारी रोजी उस तोड सुरु असताना उसतोड कामगारांना अंदाजे पंचवीस ते तीस दिवसाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्याच संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ नये म्हणून पिल्ले ज्याठिकाणी सापडले त्याच ठिकाणी पुन्हा क्रेटमध्ये ठेवले व क्रेटच्या बाजूला सुरक्षेसाठी कॅमेरे लावले. मात्र मादी पिल्ले काही कारणाने दोन दिवस घेऊन जात नव्हती.

16,17,18 या तीनही  दिवशी वनविभागाने सदर दोन्ही बिबट्याच्या पिल्लांची काळजी घेतली. वनविभागाचे डॉक्टर चंदन सवने यांनी दोन्ही पिलांना विशेष काळजी घेत त्यांना आवशक ते पोषण आहार व पाणी दिवसातून तीन वेळा दिले. उष्णता असल्यामुळे विशेष काळजी घेण्यात आली होती. सदर सापडलेल्या पिलांत एक मादी व एक नर असे पिलू होते. त्यापैकी नर पिल्लू हे जास्त अशक्त होते तसेच त्याची शेपटी आणि एका मागील पायाला इजा होती. त्यासाठी तीन दिवस सकाळच्या सदर मध्ये डॉक्टर चंदन यांनी त्या नर पिलावर उपचार केले . काल सोमवारी 18 संध्याकाळी पुन्हा 5.30 वाजता पिल्ले घेऊन घटना स्थळी वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानाद्वाण्याजीव रक्षक रोहन भाटे , दो चंदन सावने, वनरक्षक शीतल पाटील , वनमजूर शंभू माने व अमोल पाटील हे गेले.

पिल्ले सापडलेल्या ठीकानापासून शेजारी असलेल्या एका नांगरलेल्या शिवारात पिल्ले ठेवण्याची नवीन जागा निवडून रोहन भाटे यांनी विशिष्ठ पद्धतीने क्रेट मातीत ठेऊन त्यामध्ये पिल्ले ठेवली. तसेच क्रेट च्या दोन्ही बाजूला मादीची हालचाल टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. सदर क्रेट च्या आजू बाजूला दोन दिवसांपासून बिबट्यांच्या त्या पिलांचे मुत्र हे गोळा करून ठवलेल होते जे क्रेट च्या आजू बाजू परिसरात मुदामून काही झाडांवर व दगडांवर टाकण्यात आले जेणे करून मादीला पिलांचा वास जावा.

एक पिल्लू जे अगदी सशक्त होते त्याला मुद्दामून सकाळ दुपारपासून उपाशी ठवले होते जेणेकरून ते भुकेले असल्यामुळे रात्री आपल्या आईला आवाज देईल. अगदी तसेच झाले सदर सशक्त पिल्लू सदर रानात ठेवल्यावर जोर जोरात आपल्या आई ला आवाज देऊ लागले.रात्री 11.30 ला मादी बिबट्या आली व ती सदर शिवारात रात्री दीड वाजेपर्यंत आपल्या पिलांसोबत होती. नंतर ती पिल्लांना सुखरूपपणे घेऊन गेली.

सदर कारवाई साठी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झाणझुरणें वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , डॉ चंदन सवने , वनरक्षक म्होप्रे शीतल पाटील ,उत्तम पांढरे, भरत खटावकर वनमजूर शंभू माने वनमजूर अमोल पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली व एका आई चे व तिच्या पिलांचीभेट घडवून आणली.

संबंधित बातम्या

Anil Bonde | यशोमती ठाकूर यांच्यावरील टीका भोवली, अमरावतीत अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aurangabad | अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात, औरंगाबादेत महिलेसोबतचा व्हिडिओ होता चर्चेत!

Marathi Sahitya Sammelan: ‘उद्घाटक म्हणूस स्वागत पण भोंग्यावरही बोला’ ‘आप’ने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात दडलंय काय?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.