AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले”; ठाकरे गटाने शिंदे गटाची कुंडली बाहेर काढली

पाटणमध्ये आज पत्रकारांबरोबर बोलताना भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर राजकारण कसे केले.

देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले; ठाकरे गटाने शिंदे गटाची कुंडली बाहेर काढली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 7:32 PM
Share

पाटणः गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने विकास कामांना गती दिल्या असल्याचे बातम्या येत आहेत. आता जी विकास कामं केली जात आहेत, ती विकासकामं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजून झालेली होती अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी दिली. शिंदे गटाबरोबर युती झाली असली तरी शिंदे गटाचा स्वाभिमान होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र शिंदे गटातील मंत्री आणि नेत्यांनी स्वाभिमान दाखवण्याचा काम केले नसल्याचे दिसून आले.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले अशीच अवस्था आता झाली असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने ही सगळी कामं थांबवली. त्यामुळे विकासाची कामं ही उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकार्यकाळात मंजूर झालेली आहेत.

त्यामुळे शिंदे गट आज जरी ही आम्ही मंजूर केलेली कामं आहेत असं सांगत असली तरी ती विकासकामं ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली होती असंही भास्करराव जाधव यांनी सांगितले.

पाटणमध्ये आज पत्रकारांबरोबर बोलताना भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर राजकारण कसे केले.

आपण निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षाचे चिन्हच त्यांनी संपवण्याचा डाव कसा केला हेही त्यांना यावेळी सांगितले. शंभूराज देसाई यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता राजकारण करून दाखवावं असा टोलाही त्यांना त्यांना लगावला आहे.

Follow Us
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित