Video : रुबाब फक्त उदयनराजेंचा, बैलगाडा शर्यतीत राजेंची धमाकेदार एन्ट्री पाहून तु्म्हीही फॅन व्हाल
साताऱ्यात देगाव येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे (Udayanraje Birthday) मित्र समूहाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज खासदार उदयनराजेंनी चक्क बैलगाडीतून या कार्यक्रम ठिकाणी एन्ट्री केली.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये (Udayanraje Collar style) प्रिय आहेत. साताऱ्यात देगाव येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे (Udayanraje Birthday) मित्र समूहाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज खासदार उदयनराजेंनी चक्क बैलगाडीतून या कार्यक्रम ठिकाणी एन्ट्री केली. यावेळी उपस्थित समर्थकांनी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी एकच जल्लोष केला. डोक्यावर फेटा,गळ्यात फड्या अन हातात वेसण घेऊन छत्रपती उदयनराजेंनी बैलगाडी हाकली. ढोल ताश्यांच्या गजरात बैलगाडा प्रेमींनी उदयनराजेंचे स्वागत केलं. त्यामुळे राजेंच्या या एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली. राजे कधा जिप्सीतून भरधाव वेगानं राईड मारतात, कधी बाईक राईड, तर कधी अशी हटके अंदाजात एन्ट्री.
मोठ्या लोकांच्या घोड्यांच्या शर्यतीवर बंदी नाही
यावेळी बोलताना,मध्यंतरी बैलगाडा शर्यती वर बंदी का घातली हे मला माहीत नाही मात्र मोठमोठ्या लोकांच्या घोडे शर्यतींवर बंदी घालण्यात आली नव्हती. कारण तिथं मोठया पैशाच्या उलाढाली होतात. अशी टीकाही राजेंनी केली. शेतकरी आपल्या पोटच्या मुलांपेक्षा बैलांना जपतात. त्यांचं पालन पोषण करतात.शेतकऱ्यांचा हा छंद पारंपरिक पद्धतीने सुरु आहे. स्पर्धा सुरु व्हायला या लोकांचं श्रेय आहे.मी फक्त निमित्त आहे, असेही यावेळी राजेंनी सांगितले.
शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे
उदयनराजेंनी बैलगाडीतून केलेल्या अनोख्या एंट्री बाबत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, मी एक शेतकरीच आहे. माझ्या इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रात पहा. असेही राजेंनी सांगितलं. तसेच इकॉनोमी बेस असलेल्या या शेतकरी वर्गाला कर्ज दिले जात नाही पैसे वाल्यांना कर्ज दिलं जातं. मी मोठ्या गाडीतून फिरतो तर या शेतकऱ्यांनी मोठ्या गाडीतून फिरल तर काय बिघडलं. मोठ्या लोकांना सबसिडी दिली जाते शेतकऱ्यांना सबसिडी दिली जात नाही. या शेतकरीवर्गाचे भवितव्य उज्ज्वल झालं पाहिजे असं मला वाटतं. असेही राजे म्हणाले. तसेच मी राजकारणात असलो तरी समाजकारण करत असतो. मला काही घेणे देणे नाही उद्या म्हणलं तरी राजीनामा देतो. पण एका अटीवर या लोकांचं काही तरी कौतुक व्हावे. या शेतकरी वर्गाला पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. जर त्यांनी विचार केला नाही तर खासदार असो आमदार असो यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही राजेंनी राजकारण्यांना बजावले आहे.
फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर
नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले
