रिल्स स्टार, 50 हजार फॉलोवर्स पण प्रत्यक्षात निघाली खोक्याची भाची चोर, बसमधून महिलांचे…
काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या हा तूफान चर्चेत आला होता. खोक्याचे काही हैराण करणारे व्हिडीओ व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. तो थेट लोकांना बेदम मारहाण करताना दिसला.

आमदार सुरेश धस यांचा खंदा समर्थक खोक्या ऊर्फ सतीश भोसले तूफान चर्चेत होता. खोक्यावर काही गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर जेलमध्येही जाण्याची वेळ खोक्यावर आली. खोक्याची धक्कादायक व्हिडीओही व्हायरल होताना दिसली. आता पुन्हा एकदा खोक्या चर्चेत आला असून प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरणारी रिल्स स्टारला खोक्याची नातेवाईक म्हणजेच भाजी असल्याची माहिती पुढे आली. रिल्स स्टार आणि खोक्या ऊर्फ सतीश भोसले यांचे काही फोटो व्हायरल झाली आहेत. पोलिसांनी या रिल्स स्टारला अटक केली असून तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकण्यात आल्या. रिल्स स्टार कोमल काळे ही सतीश भोसले याची भाची आहे. सोशल मीडियावर रील्समुळे लोकप्रिय कोमल काळे होती. मात्र, प्रत्यक्षात प्रियकराच्या साथीने ती चोरी करत.
सोशल मीडियावर कोमल काळे हिचे 50 हजार फॉलोवर्स आहेत. हेच नाही तर कोमल काळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे येतंय. सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आणि रिल्सने प्रसिद्ध असलेली कोमल प्रत्यक्षात एक सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. कोमल बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरत होती. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तिला अटक केली.
महिलांचे दागिने चोरून कोमल काळे ही मजा मस्ती करायची. सोशल मीडियावर 50 हजार फॉलोवर्स असणारी कोमल काळे चक्क सराईत गुन्हेगारच निघाली. कोमल काळे हिला पाथर्डी बस स्थानकात चोरी करताना अटक करण्यात आली. आहिल्यानगर जिल्हात मागील काही दिवसांपासून बसमध्ये प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.
सतत बसमध्ये चोरीच्या घटना घडत होत्या. शेवटी पोलिसांनी याचा पर्दाफास केला असून कोमल काळे आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. कोमल जगन्नाथ काळे (रा. भीमसेन नगर, शेवगाव) आणि तिचा प्रियकर सुजीत राजेंद्र चौधर (रा. निपाणी जवळा, पाथर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कोमल काळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती चोरीच्या घटना सहजपणे करायची. कोमलच्या अटकेमुळे अजून काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, असे सांगितले जातंय.
