विखे-पाटील म्हणतात, राठोडांचा राजीनामा घ्या; आदित्य ठाकरे म्हणतात, माहिती घेऊन बोलतो

उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. | Pooja Chavan suicide case

विखे-पाटील म्हणतात, राठोडांचा राजीनामा घ्या; आदित्य ठाकरे म्हणतात, माहिती घेऊन बोलतो
aaditya thackeray

अहमदनगर: सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) किती तडजोडी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Suicide) राज्याची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. (Shiv Sena MLA Aaditya Thackeray on Sanjay Rathod and pooja Chavan suicide case)

ते शनिवारी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव समोर आले आहे. याप्रकरणातील ऑडिओ क्लीप्सची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

‘आदित्य ठाकरेंनी पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणे टाळले’

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी चिपळूण येथे प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना या सगळ्याविषयी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणावर फार बोलणे टाळले. याप्रकरणात मी थोडी माहिती घेऊन बोलेन, असे सांगत आदित्य ठाकरे यांना काढता पाय घेतला.

शिवसेनेची नेत्यांना तंबी

दरम्यान, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं

पूजा चव्हाणची आत्महत्या दुर्दैवी, पण….

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आलेय. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

संबंधित बातम्या: 

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

(Shiv Sena MLA Aaditya Thackeray on Sanjay Rathod and pooja Chavan suicide case)

Published On - 2:29 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI