ठाकरे गटाची खिल्ली उडवणारे शहाजी बापू भाजपच्या वागणुकीने हतबल… असं विधान केलं की ज्याने काळजाचा ठोका चुकला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटामधून भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते नाराज असून आता शहाजीबापू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत. काय, झाडी, काय डोंगार या वाक्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी अनेकदा शिवसेना ठाकरे गटावर घणाघाती टीका केली आहे, ते नेहमीच आपल्या भाषणांमुळे चर्चेत असतात. यावेळी मात्र ते चांगलेच भावुक झाल्याचं पहायला मिळाले. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.
भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे सध्या शिवसेना शिंदे गट नाराज आहे, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ते यावेळी बोलताना चांगलेच भावुक झाल्याचं पहायला मिळाले.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
आता वास्तविक माझं स्पष्ट मत आहे की, फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे, माझं दु:ख हे आहे की इथे असं घडत होतं, हे काय त्यांना कळत नाही का? मी त्यांचा कुठलाच शब्द मोडला नाही, हे त्यांनी सांगाव. लोकसभेला माझ्या तालुक्यातून 15 हजारांचं लीड आहे. मोहिते घराण्यातला उमेदवार उभा होता, परिस्थिती बिकट होती.
माझं दुखत होतं, डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, पण ऑपरेशनला उशिर झाला त्यामुळे डॉक्टर माझ्यावर नाराज होते. त्यांनी मला सल्ला दिला होता लवकर ऑपरेश करा. पण मी ठरवलं की लोकसभा निवडणूक पार पाडायची आणि नंतर ऑपरेशन करायचं. माझ्या ऑपरेशनला तीन महिने लेट झाला. मला त्यावेळी गंभीर आजार पण साधा वाटला, पण निंबाळकरांसाठी ते आपलं कर्तव्य आहे, मित्र पक्षासाठी आपलं कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केलं, असं यावेळी शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
