ओल्या काजूची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खास मेनू

ओल्या काजूगराची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी, मोदक असे चवदार पदार्थांचा मेनू आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी असणार आहे. खास कोकणी जेवण उद्धव ठाकरे यांच्यासाठी तयार केले गेले आहे. रविवारपासून उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे. मुंबईला आज ते वंदे भारत एक्स्प्रेसने परतणार आहे.

ओल्या काजूची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खास मेनू
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 9:07 AM

मनोज लेले, रत्नागिरी, दि. 5 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख सलग दुसऱ्या दिवशी कोकणात मुक्कामी आहेत. त्यांच्या या दौऱ्यात रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज खास मेनू तयार करण्यात आला आहे. ओल्या काजूची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी, मोदक उद्धव ठाकरे यांच्यासाठी तयार केले गेले आहेत. आमदार राजन साळवी यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मेनू तयार केला गेला आहे.

राजन साळवी यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पथक त्यांच्या घरी पोहचले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आमदार राजन साळवी यांच्या घरी भेट देणार आहेत. यावेळी रश्मी ठाकरेही असणार आहेत. राजन साळवी यांच्या घरी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी जेवणाचा खास मेनू तयार केला गेला आहे. त्यात ओल्या काजूगराची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी, मोदक असे चवदार पदार्थ आहे. खास कोकणी जेवण उद्धव ठाकरे यांच्यासाठी तयार केले गेले आहे.

विनायक राऊत यांचे बॅनर

खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा लोकसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा प्रकारचे जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे संभाव्य लोकसभा उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. राजापूरात येणारे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीबाबत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे करणार वंदे भारतने प्रवास

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा असा असणार आहे.

  • सकाळी १०.०० वा. कणकवली येथून राजापूर कडे निघणार
  • सकाळी ११.०० वा. राजापूर जवाहर चौक येथे शिवसैनिकां समवेत संवाद
  • सकाळी ११.४५ वा.श्री. देव धुतपापेश्वर मंदिर दर्शन व मंदिर बांधकाम पाहणी.
  • दुपारी १२.१५ वा. श्री. देव धुतपापेश्र्वर मंदिर ते रांनतळे पावस मार्गे रत्नागिरीकडे प्रयाण
  • दुपारी ०९.४५ वा. शिवसेना कार्यालय आठवडा बाजार येथे शिवसैनिकांशी संवाद
  • दुपारी ०२.१५ वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी
  • दुपारी ०३.०० वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थान रत्नागिरी येथून विमानतळ रस्ता मार्गे करबुडे फाटा उक्षी – वांद्री मार्गे शास्त्री पूल ता. संगमेश्वर कडे
  • सायंकाळी ०४.१५ वा. शास्त्री पूल ता. संगमेश्वर येथे शिवसैनिकांसमवेत संवाद
  • सायंकाळी ०४.३० वा. शास्त्री पूल ता. संगमेश्वर येथून चिपळूण कडे
  • सायंकाळी ०५.४० वा. चिपळूण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आगमन व शिवसैनिकांसोबत संवाद.
  • सायंकाळी ०६.१५ वा. चिपळूण येथून खेडकडे
  • सायंकाळी ०७.०५ वा. २२२३० वंदेभारत एक्सप्रेसने खेड रेल्वे स्थानक येथून मुंबईकडे रवाना
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.