AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रस्तावित मेडिकल कॉलेजवरुन शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये स्पर्धा, मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम आमनेसामने

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारली जातील अशी घोषणा केली आहे. त्यानंतर दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली दौऱ्यावर आलेल्या राजेश टोपे यांच्याकडे हे कॉलेज दापोलीमध्ये उभारण्याची मागणी केली आहे.

प्रस्तावित मेडिकल कॉलेजवरुन शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये स्पर्धा, मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम आमनेसामने
| Updated on: Nov 24, 2020 | 1:57 PM
Share

रत्नागिरी: प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना पाहायला मिळत आहे. मेडिकल कॉलेज कुठे उभारलं जावं यावरुन शिवसेनेच्याच दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. रत्नागिरीचे आमदार तसेच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतच मेडिकल कॉलेज होईल अशी घोषणा केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचेच आमदार योगेश कदम यांनी हे कॉलेज दापोलीमध्ये व्हावं अशी मागणी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या उभारणीवर शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच स्पर्धा रंगल्याचं चित्र सध्या आहे.(Competition between two leaders of Shivsena from the proposed medical college in Ratnagiri district)

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारली जातील अशी घोषणा केली आहे. त्यानंतर दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली दौऱ्यावर आलेल्या राजेश टोपे यांच्याकडे हे कॉलेज दापोलीमध्ये उभारण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मेडिकल कॉलेजचं काम सुरु झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी सगळेच आमदार प्रयत्न करत आहेत.

भौगोलिकदृष्या दापोलीच योग्य- योगेश कदम

भौगोलिकदृष्ट्या दापोली हे कोकणाचं सेंटर आहे. अलिबाग पासून सिंधुदुर्गपर्यंत विचार केला तर रायगडचं मेडिकल कॉलेज हे अलिबागमध्ये होणार आहे. तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज हे सिंधुदुर्गातच होणार आहे. दापोली मतदारसंघ हा दोन्ही मेडिकल कॉलेजच्या मध्यभागी आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दापोलीच योग्य जागा ठरेल, असा दावा आमदार योगेश कदम यांनी केला आहे. तर दापोलीला अनेक शासकीय जागा असल्याचं सांगत, दापोली मतदारसंघात मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, असा आपला आग्रह असल्याचं योगेश कदम म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही आपण चर्चा केल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.

योगेश कदमांची समजूत काढू- उदय सामंत

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतही मेडिकल कॉलेज रत्नागिरीतच होणार यावर ठाम आहेत. त्यासंदर्भातील अध्यादेश पुढील काही दिवसात काढला जाईल, असं उदय सामंत म्हणाले. दरम्यान योगेश कमद यांचीही मागणी योग्य आहे. पण त्यांची समजूत काढली जाईल, असंही सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुंबई विद्यापीठात बाळासाहेब ठाकरेंच्या नावे अध्यासन केंद्राची स्थापना, उदय सामंत यांची घोषणा

उदय सामंतांची श्रीकांत देशपांडेंच्या प्रचारार्थ सभा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या

शिवसेना आमदार योगेश कदम अजित पवारांच्या भेटीला

Competition between two leaders of Shivsena from the proposed medical college in Ratnagiri district

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.