AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला (Siddhivinayak temple close due to corona) आहे.

Corona Virus : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद
| Edited By: | Updated on: Mar 16, 2020 | 4:39 PM
Share

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला (Siddhivinayak temple close due to corona) आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिद्धीविनायक मंदिराचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शन बंद (Siddhivinayak temple close due to corona) ठेवण्यात येणार आहे.

राज्यसरकारने राज्यातील सर्व देवस्थान संस्थानांनाही मंदिर बंद ठेवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सिद्धीविनायक बाप्पाचे दर्शन शासनाचे आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहे.

याशिवाय राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, गर्दीची ठिकाणी जाणे टाळा असे आवाहनही केले आहे. परंतु, सदर कालावधीत मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदतीसाठी, वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहिल.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संपूर्ण देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका पर्यटन स्थळे आणि देवस्थानांनाही बसला आहे. राज्यातील प्रमुख देवस्थान अंबाबाई, शिर्डी, सिद्धिविनायक, तुळजाभवानी, सप्तश्रृंगी देवी, काळुबाई, पंढरपूर येथील भाविकांची गर्दी ओसरली आहे.

संबधित बातम्या : 

Corona | तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द 

Corona | मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 5 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 38 वर

‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही लागण

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.