निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद झाला आहे. Solapur Barshi jawan martyr

निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 10:55 AM

सोलापूर : एकीकडे चीनसोबत तणाव सुरु असताना, इकडे पाक सीमेवरही दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरुच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद झाला आहे. पुलवामाजवळ बंडजु या भागात भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत, बार्शी तालुक्यातील पानगावचे वीर सुनील काळे (Sunil Kale martyr) हे धारातीर्थी पडले. सुनील काळे हे केंद्रीय राखीव संरक्षण दलामध्ये कार्यरत होते. सुनील काळे यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच बार्शी शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (Solapur Barshi jawan martyr)

भारतीय जवानांना जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती आज पहाटे मिळाली होती. यावेळी CRPFच्या एका तुकडीने बंडजु परिसराची पाहणी केली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरल्यानंतर, अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सुनील काळे हे शहीद झाले.

दुसरीकडे भारतीय जवानांनीही दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी जागच्या जागी ठार झाले. मात्र या चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद झाल्याने राज्यावर शोककळा पसरली.

शहीद जवान सुनील काळे हे मूळ बार्शी तालुक्यातील पानगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला

पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारतीय जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहेत. नुकतंच तीन दिवसापूर्वी भारतीय सीमसुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला. बीएसएफने कठुआ बॉर्डरवर पाकचा ड्रोन टिपून उद्ध्वस्त केला.

चीनसोबत संघर्ष

भारत आणि चीन यांच्यात LAC वर संघर्ष सुरु आहे. 15 जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे भारतात संतापाची लाट आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. “एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही. सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडेही फायटर प्लेन आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं.

(Solapur Barshi jawan martyr)

संबंधित बातम्या 

दिल्लीत अतिरेक्यांचा मोठा घातपात घडवण्याचा बेत, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि… 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?  

कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज, भारतीय सैन्याला शक्तीशाली हत्यारं खरेदी करण्यासाठी 500 कोटी 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.