आम्हाला गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही : सुशीलकुमार शिंदे

आम्हाला गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : आम्हाला गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही. मी फक्त काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटायला गेलो होतो ,तिथे अनपेक्षितपणे प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली.  तिथे असणाऱ्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोटो काढून त्यांनीच व्हायरल केले असा दावा काँग्रेस नेते आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

नुकतेच सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर  काल प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यावरच सडकडून टीका केली होती. “मुद्दामहून कोणाला तरी भेटायचे हे काँग्रेसचे डावपेच आहेत. भेट घेऊन त्याचे फोटो व्हायरल करण्याची कामे काँग्रेसवाले करतात. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे” अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

वाचा  – ‘वंचित’ने भाजपची सुपारी घेतली, सुशीलकुमार शिंदेंचा हल्लाबोल  

काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे, असा घणाघात सुशीलकुमार शिंदेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

एमआयएमसोबत एकत्रित येताना तुमची तत्वं कुठे गेली? असा सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. वंचित बहुजन आघाडी म्हणजे ‘वोट कटवा’ आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या 

‘वंचित’ने भाजपची सुपारी घेतली, सुशीलकुमार शिंदेंचा हल्लाबोल

अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे  

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!  

 सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *