शेतकरी बापाचा नाद खुळा, पोराच्या लग्नासाठी थेट आणला हत्ती; लग्नाची सर्वत्र चर्चा

ही घटना घडली आहे माढ्यातील उंदरगावच्या शेतकऱ्याच्या बाबतीत. शेतकरी रामदास नाईकवाडे यांनी आपल्या मुलाचे लग्न थाटात पार पाडले. पण, या लग्नाचं खास आकर्षण होत ते म्हणजे

शेतकरी बापाचा नाद खुळा, पोराच्या लग्नासाठी थेट आणला हत्ती; लग्नाची सर्वत्र चर्चा
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 12:54 PM

सोलापूर : हौसेला मोल नाही, असं म्हणतात. लग्न ही हौसेची बाब. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार खर्च करत असतो. सोलापुरातील शेतकऱ्याने आपल्या मुलाचं लग्न थाटात करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने वरात काढताना थेट हत्ती आणायचा ठरवला. खर्च खूप येणार होता. दुसरीकडं काटकसर करून त्यांनी लग्नाची वरात थेट हत्तीवरून काढायची ठरवली. वरातील वऱ्हाडी नाचत असताना मुलगा हत्तीवर बसला होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. ही घटना घडली आहे माढ्यातील उंदरगावच्या शेतकऱ्याच्या बाबतीत. शेतकरी रामदास नाईकवाडे यांनी आपल्या मुलाचे लग्न थाटात पार पाडले. पण, या लग्नाचं खास आकर्षण होत ते म्हणजे हत्तीवरून निघालेला नवरदेव. हत्तीवरून जात असताना या नवरदेवाचा थाट काही औरच होता.

hatti 3 n

हत्तीवरून वरात काढणं काही सोपं नाही

वऱ्हाडी अंचबित झाले. काही थाट केला राव, असे शब्द त्यांच्या तोंडातून सहज निघत होते.उंदरगाव हे छोटसं गाव. या गावात कुणी कधी लग्नाची वरात हत्तीवरून काढली नसेल. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा होती. ती शेतकऱ्यानं मुलाच्या लग्नात काय हौस केली बघा. मुलाला मुलीच्या घरी जात असताना थेट हत्तीवरच बसवलं. हत्तीवरून वराची वरात काढणं काही सोप काम नाही. पण, या शेतकऱ्याचा नादच खुळा. त्यामुळे त्याने ही हौस सहज भागवली.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्याला भागवता आली हौस

घोड्यावरून, गाडीवरून वरात काढणे सामान्य बाब आहे. आधी खाचर, बैलबंडीवरूनही नवरदेव जात होता. आता जमाना बदलला. पैसे हातात खेळू लागले. त्यामुळे महागड्या वस्तूंचा वापर सुरू झाला. शेतकऱ्याकडेही दोन पैसे जास्त आले असतील. त्यामुळं त्याला ही हौस भागवता आली.

हौसेला मोल नाही

हत्ती सांभाळणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे हत्तीवर बसवण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. तरीही या शेतकऱ्याने काही पर्वा केली नाही. पण, हौसेला मोन नसते, असं म्हणतात. ही हौस भागवण्यासाठी या शेतकऱ्याने हा सारा खटाटोप केला.

Non Stop LIVE Update
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.