‘राम कदम तू हिशोबात रहा, अन्यथा तुझा…’ ठाकरे गटाच्या उपनेत्याची जीभ घसरली
"उद्धव ठाकरेंवर टीका करायला तुझी औकाद काय आहे? आया बहिणींना उचलून आणण्याची भाषा करणारा माणूस, प्रत्येक आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा खट्टा मीठा चित्रपटातील अन्सारी आहेस" अशा शब्दात ठाकरे गटाच्या उप नेत्याकडून टीका.
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा महाराष्ट्रात सामना आहे. अनेक नेते परस्परांवर टीका करतायत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राम कदम तू तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस; उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही. राम कदम तू हिशोबात रहा, अन्यथा तुझा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त केला जाईल” अशी शरद कोळी यांनी धमकीची भाषा केली आहे.
राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेनंतर शरद कोळी आक्रमक झाले आहेत. “उद्धव ठाकरेंवर टीका करायला तुझी औकाद काय आहे? आया बहिणींना उचलून आणण्याची भाषा करणारा माणूस, प्रत्येक आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा खट्टा मीठा चित्रपटातील अन्सारी आहेस” अशा शब्दात शरद कोळी यांनी टीका केली आहे.
‘भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडला आहेस’
“राम कदम तू तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस. उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही. मनसेतून हाकलून दिल्यानंतर भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडला आहेस. राम कदम तू हिशोबात रहा, अन्यथा तुझा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त केला जाईल” असे शब्द शरद कोळी यांनी वापरले आहेत.