महाराष्ट्रात बळीराजाने करून दाखवलं! ‘ब्लॅक राईस’ ची मागणी वाढली, वाचा खास वैशिष्ट्ये

महाराष्ट्राच्या अकोला तालुक्यातील शेतकऱ्याने सलग दोन हंगाम काळ्या भात पिकवला आहे

महाराष्ट्रात बळीराजाने करून दाखवलं! 'ब्लॅक राईस' ची मागणी वाढली, वाचा खास वैशिष्ट्ये

मुंबई : तांदूळ आपल्या भोजनातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे. यासाठी संपूर्ण जगभरात मागणी असते. आता देशभरातील तांदळाच्या सर्व प्रकार तुम्ही पाहिले किंवा खाल्लेही असतील. सध्या सगळेच शेतकरी पांढर्‍या रंगाचे तांदूळ पिकवतात. पण महाराष्ट्राच्या अकोला तालुक्यातील शेतकऱ्याने सलग दोन हंगाम काळ्या भात पिकवला आहे. सामान्यत: ईशान्येकडील राज्यात या उत्पादनात इतर भागातही लागवड करता येते. या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तांदळाची शेती थोडी वेगळी आहे, कारण शिजवल्यावर या भाताचा रंग निळ्या-व्हायलेटच्या रंगात बदलतो. म्हणून ते निळा भात असंही म्हणतात. (success story of black rice cultivation farmers who earn good income in maharashtra)

द बॅटर इंडियाने दिलेल्या अहवालानुसार, मेहेंदुरी गावचे शेतकरी विकास अरोट यांनी 2019 मध्ये 3 किलो काळ्या भाताची लागवड केली होती. ही अशी काही शेती झाली की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पीक होते. कारण, बहुतेक कुटुंबं खरीप हंगामात भात उगवतात आणि रब्बी हंगामात मिश्र पीक पद्धतीची शेती करतात. पण या निळ्या भाताच्या शेतीसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (ATMA) च्या रोजास बेंद्रे यांनी विकास यांना विश्वासात घेतलं आणि विनंती करून भाताची शेती करण्यास सुरुवात केली.

या शेतीसाठी पेरणीनंतर 110 दिवसानंतर भात कापणी करण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक जेव्हा फुलतं तेव्हा छान सुगंध पसरलेला असतो. विकास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शेतामध्ये सुमारे 210 किलो काळा तांदूळ पिकवला आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या शेतीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून भाताचं पीक कधीच घेण्यात आलं नव्हतं.

अरोट यांनी मोठ्या उत्साहाने या काळ्या भाताची शेती केली आणि त्यांना यातून चांगलं यशही मिळालं. जून 2020 मध्ये अकोला तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारीही यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अरोट यांच्या मदतीने काळ्या भाताच्या बियाणांचं वितरण करण्यास सुरुवात केली. यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाबद्दल अरोट आणि त्यांच्या पत्नीचे आभारही मानले आहे.

काळा तांदळाचा काय आहे फायदा ?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तांदळापासून लापशी आणि इतर गोड पदार्थही बनवले जातात. महाराष्ट्रातील कृषी विभागाने अकोल्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या शेतीसाठी प्रेरणा देण्याचं काम सुरु केलं असून यासाठी खास योजनाही आखण्यात आल्या आहेत. जेणेकरून इथले शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतील.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईशान्य भारत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काळ्या तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या तांदळामध्ये सुगंध आणि आरोग्याची भरपूर संपत्ती आहे. याची शेतीही शेतकऱ्यांसाठी फायद्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. (success story of black rice cultivation farmers who earn good income in maharashtra)

संबंधित बातम्या –

सचिन तेंडुलकरांचा ‘असा’ अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? : देवेंद्र फडणवीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात हजेरी लावणार

मनसेचं ‘एकला चलो रे’! भाजपसोबत युतीसंदर्भातील चर्चेला राज ठाकरेंकडून पूर्णविराम

मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

(success story of black rice cultivation farmers who earn good income in maharashtra)

Published On - 8:17 am, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI