AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भयंकर, झोपेत असतानाच साप बारकीच्या अंथरुणात शिरला, दोन तास डोलत राहीला, वर्ध्यात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

एक एक क्षण पुढं सरकत नव्हता आणि समोरच्या संकटातूनही सुटका होत नव्हती. पूर्वाकडं बघून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. आईची अवस्था तर विचारु नका. असेच शेवटी दोन एक तास निघून गेले. गर्दी, त्यांचा थोडासा कलकलाट ह्या सगळ्यातून शेवटी सापानं स्वत:चं प्रस्थान हलवलं

Video: भयंकर, झोपेत असतानाच साप बारकीच्या अंथरुणात शिरला, दोन तास डोलत राहीला, वर्ध्यात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग
वर्ध्यातला हाच तो फोटो जो ह्या घटनेनंतर व्हायरल झाला
| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 11, 2021 | 8:29 PM
Share

पावसाळा सुरु आहे आणि त्यामुळे ‘इचुकाडा’ काही कमी नाही. त्यातल्या त्यात गावाकडं घराच्या आजूबाजुला गुडघाभर ‘आयचन’ वाढलंय. त्यात मग पुन्हा दोन दोन दिवस पावसाची रिपरिप. कधी कधी मुसळधार. अशा ह्या पाऊसपाण्यामुळे सापासारखी जनावरं सैरभैर झाली नाही तर नवलच. कोरड्या जागेच्या शोधात ह्या सापांनी घरात घुसखोरी केलीय आणि नेमकं तेच आता धोकादायक झाल्याचं दिसतंय. वर्ध्यात जो प्रसंग घडला त्यानं काळजाचं पाणी पाणी झालं. काहींना हार्ट अटॅक येतो की काय अशी अवस्था होती. झोपेत असलेल्या मुलीच्या अंथरुणात साप शिरला आणि तो पाच दहा मिनिटं नाही तर थेट दोन तास फणा काढून डोलत राहीला.

नेमकं काय घडलं? वर्धा तालुक्यात बोरखेडी-कला नावाचं गाव आहे. ह्याच गावात गडकरींचं कुटुंब राहतं. शुक्रवारी रात्री पूर्वा गडकरी नावाची सहा वर्षाची छोटी मुलगी तिच्या आईसोबत झोपी गेली. अर्थातच तिचं अंथरुण जमीनीवर होतं. बाजुलाच एक दुसरा पलंगही टाकलेला होता. पूर्वा खाली गादीवर झोपलीय. फोटोत बघितलं तर जागा तशी ऐसपैस दिसत नाही. आई आणि मुलगी दोघीही झोपी गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजे बाराच्या आसपास आईला काही चुळबूळ होत असल्याचं लक्षात आलं. काही तरी अंगावर सरपटतंय असं वाटायला लागलं. आई गडबडीनं उठली आणि अंथरुणाच्या बाजूला झाली. जरा दिवा मोठा करुन बघितला तर अंथरुणावर साप होता. तोही भला मोठा. आई स्वत: बाजूला झाली खरी पण सहा वर्षाच्या पूर्वावर संकट कोसळलं. कारण तो साप पूर्वाच्या अर्ध्या अंगाखाली होता आणि आता त्यानं फणा काढला होता. पूर्वालाही जाग आली पण ती स्तब्ध राहीली. बिचारीला काय घडतंय हे फार कळत नसावं पण आपल्या अंगावर साप आहे हे तिला कळतच होतं. तीही घाबरुण गेली. काही वेळातच तिला खरं तर घाम सुटला.

शेवटी तो डसलाच

आईनं आजूबाजूच्या लोकांनाही उठवलं. पूर्वाची सुटका कशी करायची असं मोठं संकट उभं ठाकलं. पूर्वा जशी झोपली होती तशीच आता स्तब्ध होती. तिला तसच राहायला सांगितलं होतं. साप आता जाईल, थोड्या वेळानं जाईल याची सगळे जण वाट बघत राहीले. पण फणा काढलेला साप आता जाग्यावरून थोडाही हलत नव्हता. पूर्वा पुरती भीतीग्रस्त झाली होती. बघता बघता गाव जागं झालं. गडकरींच्या घराबाहेर आणि आत बघ्यांची गर्दी वाढली. मध्यरात्रं उलटून गेली होती. गर्दी वाढल्यामुळे असेल पण सापही भीतीनं आता जागचा हलत नव्हता. पूर्वाला ओढून घ्यावं किंवा तिला तातडीनं बाजूला सरकायला सांगावं तर सापानं फणा काढलेला होता आणि एक चूकही महागात पडली असती. त्यामुळे सगळे जण सापाच्या जाण्याचीच वाट बघत बसले. एक एक क्षण पुढं सरकत नव्हता आणि समोरच्या संकटातूनही सुटका होत नव्हती. पूर्वाकडं बघून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. आईची अवस्था तर विचारु नका. असेच शेवटी दोन एक तास निघून गेले. गर्दी, त्यांचा थोडासा कलकलाट ह्या सगळ्यातून शेवटी सापानं स्वत:चं प्रस्थान हलवलं. पण जाताना तो डसलाच. पूर्वाच्या हाताला त्यानं चावा घेतला. नंतर पूर्वाला सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरु आहेत. एवढ्या गर्दीतही साप पोबारा करण्यात यशस्वी झाला.

‘रात्रीस खेळ चाले 3’च्या गणपती स्पेशल भागाचे हटके पद्धतीने चित्रीकरण, प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार कोकणी संस्कृती!   

VIDEO : Mumbai Sakinaka Case | सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडतायत -प्रविन दरेकर

बलात्काराच्या 4 घटनांनी महाराष्ट्र हादरला, पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली