Uddhav Thackrey : बापाचं नाव लावायलां लाज वाटते का ? उद्धव ठाकरे
महापालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली असून 'ठाकरेंचा शब्द' यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. मोदी गॅरेंटी चालत नाही, असे म्हणत त्यांनी 'ठाकरे ब्रँड' आणि आपल्या घराण्याच्या परंपरेचा, बाळासाहेब व प्रबोधनकार ठाकरेंच्या वारशाचा जोरदार बचाव केला. संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासूनची आपली परंपरा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना फटकारले.

20 वर्षांनी एकत्र आलेल्या, उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंची युती झाली असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांची संयुक्त सभा, मुलाखती सुरू आहेत. त्यांचा वचननामाही रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये शब्द ठाकरेंचा असा उल्लेख असून त्यावरून विरोधकांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र त्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष यांनी सडेतोड उत्तर दिलं . ठाकरेंचा शब्द आहे असं लिहीलंय कारण मोदी गॅरेंटी आता चालत नाही. त्यावर ठाकरे हा ब्रँड आता नाही, बाळासाहेहब ठाकरे हातच एकमेव ब्रँड होता, असा टोलाही विरोधकांनी हाणला.
वडिलांचं नाव लावायला लाज वाटते का ?
बाळासाहेब ठाकरे होते, त्यांच्याआधी प्रबोधनकार ब्रँड होते.या लोकांना (विरोधक) आगापिछा नाही, असं म्हणावं लागेल. आमच्या घराण्याची एक परंपरा आहे., पण या लोकांची परंपरा काय आहे ? यांना स्वत:च्या बापाचं नाव लावण्याची भीती वाटते का ? जसं मी माझ्या वडिलांचं नाव लावतो, यांनीही लावावं ना स्वत:च्या बापाचं नाव. आपल्या बापाचं नाव लावताना यांना लाज, लज्जा शरम का वाटते ? मी नाव लावतो ना, बाळासाहेब लावायचे , आमच्या घराण्याची परंपरा आहे. कोणी घराणेशाही म्हटलं तरी चालेल, पण घराण्याची परंपरा आहे. आणि ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या आधीपासूनची ही परंपरा आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा हे पळपुटे नव्हते कोणी, त्या लढ्यात माझे आजोब अग्रणी होते.त्या निवडणुका आल्या तेव्हा सगळ्यात शेवटी जागा मिळवण्याच्या उद्देशाने जनसंघ सामील झाला आणि सगळ्यात आधी, पहिला जनसंघच बाहेर पडला. ठाकरे ब्राँड वाचवण्यासाठी हे दोघे एकत्र आले असं म्हणतात, पण त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं.
देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही ?
विकृत नगरसेवक केले त्यावर बोलावं. साधू हत्याकांडातील आरोपी घेतला त्याच्यावर बोलावं. प्रफुल्ल पटेलवर बोलावं. त्या कुत्तावर बोलावं. देवयानी बाईंना अश्रू आवरेना. त्य़ांनी आपला पक्ष बघावा. का यांना कचरा गोळा करावा लागतो. आम्ही म्हणतो मराठी होणार. ते म्हणातता हिंदी मराठी होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही या सवालाचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.
