उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं अन्… एकनाथ शिंदे यांनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी मुंबईला नेहमी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणूनच पाहिलं आहे असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरेंनी खिचडीमध्ये, कोविडमध्ये, डेडबॉडी बॅगमध्ये, मिठी नदीमध्ये, रस्त्यामध्ये सगळीकडे फक्त घोटाळे केले आहे.
आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष एकमेकांच्या पक्षांच्या कामांवर बोलताना, टीका करताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईला नेहमी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणूनच पाहिलं आहे असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरेंनी खिचडीमध्ये, कोविडमध्ये, डेडबॉडी बॅगमध्ये, मिठी नदीमध्ये, रस्त्यामध्ये सगळीकडे फक्त घोटाळे केले आहे. आम्ही काम करून दाखवलं आहे त्यामुळे ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही. ठाकरेंनी फक्त घोटाळे करून मुंबईच वाटोळं केलं आहे, ते काय आमच्यावर आरोप करणार. ठाकरेंनी आधी त्यांच्या घोटाळ्यांचा हिशोब द्यावा, असं आव्हान एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

